Pune : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंढवा येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना काल (दि.9) बॉटनिकल गार्डन पेट्रोल पंप रोडवर दुपारी दोनच्या सुमारास घडली.

विशाल सिद्धार्थ गायकवाड (वय 29, रा. वानवडी बाजार, पुणे), असे मयताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विशाल हा मुंढव्यातील बॉटनिकल गार्डन पेट्रोल पंपाजवळून मोटारसायकलवरून जात होता. यावेळी एका अज्ञात वाहनाने भरधाव येत मोटारसायकलला धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयताचा भाऊ सागर गायकवाड याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंढवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.