Sangvi : पवना थडी जत्रेतून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पवना थडी जत्रेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. जत्रेच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 6) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

गणेश रघुनाथ आग्नेन (वय 39, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानात पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेसाठी शहरातील सर्व ठिकाणाहून नागरिक आले होते. फिर्यादी गणेश यांनी शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता त्यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / डी बी 5921) पवनाथडी जत्रेच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अर्ध्या तासात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीचे लॉक तोडून चोरून नेली. अकरा वाजता हा प्रकार उघडकीस आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.