Katraj : डोंगरावर पेटलेला वणवा अभिनेते सयाजी शिंदे व नगरसेवक राजेश बराटे यांनी विझवला

शिंदे यांच्या वृक्षप्रेमाची पुन्हा एकदा प्रचिती

एमपीसी न्यूज – कात्रज बोगद्याजवळ डोंगरावर अचानक वणवा पेटला होता. नेमके याचवेळी अभिनेते सयाजी शिंदे व नगरसेवक राजेश बराटे येथून जात असते. त्यांनी हा वणवा पाहताच वणवा पसरून अन्य झाडांना नुकसान पोहोचू नये, यासाठी तातडीने तेथेच असलेल्या झाडांच्या फांद्यांनी हा वणवा विझवला. 

अभिनेते सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम जगजाहीर आहे. हिंदी, मराठी, तमिळ, मल्ल्याळम, तेलगू, कन्नड, चित्रपटातून जितक्या बहुरंगी भूमिका त्यांनी वठवल्या आहेत. तितक्याच बहुरंगी पद्धतीने वृक्षसंवर्धनासाठी ते सतत नवनवीन उपक्रम राबवित असतात.

त्यांनी राज्यात 19 ठिकाणी तब्बल साडेतीन लाख झाडे लावून ती स्थानिकांच्या मदतीने जगवण्याचा प्रयत्न केला आहे. सयाजी पार्क या उपक्रमातून देशी झाडांच्या देवराया उभारल्या आहेत. वृक्ष संवर्धनासाठी त्यांनी नुकतीच ट्री स्टोरी ही संस्था स्थापन केली आहे.

दरम्यान, आजच्या घटनेतून अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वृक्षप्रेमाची पुन्हा एकदा प्रचिती आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.