Pimpri : रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड आरटीओ झालेल्या परमिट  घोटाळा यात बोगस शाळेचा दाखला आणि पोलीस व्हेरिफिकेशन (चारित्र्य पडताळणी) काढून शासनाची आणि हजारो रिक्षाचालकांची फसवणूक केल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड आर.टी.ओ मधील काही संबंधित अधिकारी यांची चौकशी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (९ सप्टेंबर) सकाळी 11 वाजता एक दिवसाचे आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात हवेली तालुका अध्यक्ष सदाशिव पवार, सोमनाथ कलाटे, आदी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने काही अधिकारी यांनी नियमाबाह्य कामे केल्याप्रकरणी तक्रार केली आहे. याबाबत कोणतीही कारवाई न केल्या प्रकरणी तसेच ए.यू. फायनान्स वतीने गुंडांमार्फत जबरदस्ती रिक्षा ओढून घेऊन जात आहेत. या प्रकरणी रिक्षा चालकांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. परंतु याबाबत आत्तापर्यंत दखल घेण्यात आली नाही. तसेच मुक्त रिक्षा परवाना बंद करावा बेकायदेशीर वाहतूक बंद करावी यासह इतर मागण्यासाठी रिक्षा चालक मालकांच्या वतीने पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.