Pune News : पाचवी ते आठवीच्या शाळा लवकरच सुरू करण्याच्या हालचाली

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या पाचवी ते आठवी इयत्तेपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या पुणे महापालिका प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यसरकारकडून येत्या 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभुमीवर पुणे महापालिकेच्या पाचवी ते आठवीच्या शाळा देखील सुरू करता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. त्यासाठी लवकरच मुख्याध्यापकांची बैठक संपन्न होणार आहे.

शाळा सुरू करण्याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक आहे. कारण नववी ते बारावी महाविद्यालये सुरू केल्या आहेत. त्यामध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर येत्या काही दिवसात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

येत्या आठवडाभरात प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मुख्याध्यापकांची बैठक पार पडेल. त्यानंतर शाळा सुरू करण्याचा योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.