Pune : फक्त 9 दिवसात ‘वचपा’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

वचपा आणि चॉईस या आगामी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

एमपीसी न्यूज – देवकर फिल्मस् प्रोडक्शन निर्मित ‘वचपा’ आणि सोहम फिल्मस निर्मित ‘चॉईस’ ह्या दोन्ही चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा नुकताच पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पार पडला. ‘माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं नाहितर काळ घेईलच तुमचा…‘वचपा’ अशी टॅगलाईन घेऊन ‘वचपा’ हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे असे ‘वचपा’ चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक संजय देवकर यांनी प्रसंगी सांगितले.

याप्रसंगी चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक संजय देवकर, अभिनेता सुभाष यादव, अभिनेता मिलिंद जाधव, अभिनेत्री राजश्री पाटील, बालकलाकार ऋतुराज धोत्रे, शबनम मोमीन तसेच सोहम फिल्मस निर्मित ‘चॉईस’ या चित्रपटामधुन प्रथम पदार्पण करत असलेला नवोदित अभिनेता संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

चित्रपटात ग्रामीण भागातील प्रेमकथा, कॉमेडी, अ‍ॅक्शन याची परिपूर्ण मेजवाणी प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल तसेच ‘चॉईस-तुमची आणि आमची प्रेमाची’ ह्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले असून तोही चित्रपट काही अल्पावधी काळातच प्रेक्षकांच्या भेटीला येईल असेही चित्रपटाचे दिग्दर्शक संजय देवकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.