Movies on Netflix : नेटफ्लिक्स उघडणार चित्रपटांचा खजिना

Movies on Netflix: Netflix will open a treasure trove of movies नेटफ्लिक्स भारतीय प्रेक्षकांसाठी आता तब्बल 17 नवे चित्रपट घेऊन येत आहे. नेटफ्लिक्सने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद आहेत. मालिकादेखील बंद होत्या. त्यामुळे लोकांची मनोरंजनाची सगळी साधने बंद झाली होती. नाही म्हणता ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु होते. तसेच नेटफ्लिक्स सुरु होते. म्हणूनच गेल्या काही काळात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ‘कम ऑन नेटफ्लिक्स’ असं म्हणत आपले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

हे व्हिडिओ पाहून या कलाकारांना नेमकं काय म्हणायचंय? काय सांगायचंय? हे चाहत्यांना कळत नव्हतं. परंतु, अखेर नेटफ्लिक्सने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक न ताणता त्या रहस्यावरुन पडदा उचलला आहे.

नेटफ्लिक्स भारतीय प्रेक्षकांसाठी आता तब्बल 17 नवे चित्रपट घेऊन येत आहे. नेटफ्लिक्सने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

सर्वात प्रथम जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना’ हा चित्रपट येत्या 12 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर संजय दत्तचा ‘टोरबाज’, भूमी पेडणेकरचा ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’, नवाजुद्दिन सिद्दीकीचा ‘रात अकेली है’ आणि ‘सीरियस मॅन’, राजकुमार रावचा ‘लूडो’, बॉबी देओलचा ‘क्लास ऑफ 83’, तब्बूचा ‘अ सुटेबल बॉय’, काजोलचा ‘त्रिभंगा’, ‘गिन्नी वेड्स सन्नी’, तसेच ‘मिसमॅच्ड’, ‘एके वर्सेज एके’, ‘बॉम्बे रोज’, काली खुई’, ‘भाग बीनी भाग’, ‘बॉम्बे बेगम्स’ आणि ‘मसाबा मसाबा’ हे चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.