PM Narendra Modi : भाजपचे एक नम्र आणि कष्टाळू नेते म्हणत गिरीश बापट यांना पंतप्रधान मोदीनी वाहिली श्रद्धांजली

एमपीसी न्यूज : खासदार गिरीश बापट यांचं आज दीर्घ आजारने निधन झालं आहे. 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते, (PM Narendra Modi ) अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने आणि पुण्याने भाजपचा मातब्बर नेता गमावला आहे. त्यामुळे सर्व स्तरावरुन श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Pimpri : पीएमपी बस प्रवासात वृद्धाची सोनसाखळी पळवली

नरेंद्र मोदी यांनी गिरीश बापट यांच्यासोबतच विमानतळावरील फोटोदेखील शेअर केला आहे. गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते. गिरीश बापट यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी  महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेषत: पुण्याच्या विकासासाठी ते उत्कट होते. (PM Narendra Modi) त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या संवेदना. ओम शांती, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.