Pune : खासदार संजय काकडे यांचा सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग

एमपीसी न्यूज –  शिवाजीनगर मतदार संघातील शेवटच्या मतदारापर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच संपूर्ण प्रचारयंत्रणेमध्ये सध्या खासदार संजय काकडे यांचा सक्रीय सहभाग आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारात गेल्या पंधरवड्यापासून खासदार संजय काकडे हे बारकाईने लक्ष घालत आहेत. 

संपूर्ण मतदारसंघातील वेगवेगळे मेळावे, पदयात्रा, प्रचारफेऱ्यांचे आयोजन आणि प्रचाराची सगळी यंत्रणा चोख आहे ना याकडे काकडेंचे विशेष लक्ष आहे. बुधवारी सायंकाळी काकडेंच्या हस्ते आनंद छाजेड यांच्या निवडणूक कार्यालयाचे बोपोडीत उद्घाटन झाले आणि त्यानंतर भव्य पदयात्रा पार पडली. या पदयात्रेत सिद्धार्थ शिरोळेंसोबत संजय काकडेही सहभागी झाले होते. यावेळी नगरसेवक दुर्योधन भापकर, अभय सावंत, सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, अर्चना मुसळे, बंडू ढोरे, मधुकर मुसळे, उत्तम बहिरट, ओंकार कदम, विजय शेवाळे, कैलास टोणपे, मनीष बासू, चंद्रकांत मोरे हे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, मातंग समाजाचा भव्य मेळावा मॉर्डन कॉलेजच्या सभागृहात बुधवारी घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन नगरसेविका स्वाती लोखंडे यांनी केले होते. त्यावेळी सिद्धार्थ शिरोळे यांनी मातंग समाजाच्या अपेक्षा जाणून घेतल्या. भाजपा शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, राजश्री काळे, हरिभाऊ घोडके, तुषार मोहिते या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर किलबिल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक प्राचार्य रफीक सौदागर यांची सिद्धार्थ शिरोळे यांनी भेट घेत त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.
सिद्धार्थ शिरोळे यांनी डेक्कन जिमखाना क्लब आणि टिळक स्विमिंग टँकला देखील गुरूवारी सकाळी भेट देत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी क्लबच्या क्रीडा समिती सदस्य आणि अथलेटिक्सचे सचिव अतुल रूणवाल, नियामक मंडळ सदस्य प्रमोद बकरे, सरचिटणीस विश्वास लोकरे, जलतरण विभागाचे सचिव अमित गोळवलकर, टेनिस समतीचे सल्लागार किशोर परांजपे, सुशील पाटील, विजय गवारे, मिलिंद लुंकड, एस बी मंत्री, इंद्रसेन घोरपडे, शरद नाटेकर, अनिल गायकवाड उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.