BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : खासदार श्रीरंग बारणे यांची गुळ तुळा

एमपीसी न्यूज – मावळचे दुसर्‍यांदा खासदार झालेले श्रीरंग बारणे यांची आज वलवण गावात चक्क गुळ तुळा करण्यात आली. बारणे यांच्या वजना एवढा गुळ तुळा करत नारायण धाम येथील गो शाळेला देण्यात आला.

लोणावळा शहरात विविध विकाम कामांची उद्घाटने व भूमिपूजन निमित्त खासदार बारणे हे लोणावळ्यात आले होते. यावेळी भाजपचे माजी लोणावळा शहराध्यक्ष राजेंद्र चौहान व विद्यमान भाजयुमोचे सरचिटणीस धवल चौहान यांनी खासदार बारणे यांची ही तुळा केली. यावेळी मावळचे आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला संघटक शादान चौधरी, शहराध्यक्ष सुनिल इंगूळकर, नगरसेवक दिलीप दामोदरे, राजु बच्चे, देविदास कडू व मान्यवर उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3