Pimpri News: स्मार्ट सिटीतील कथित भ्रष्टाचाराची खासदार बारणे यांनी केली दिल्लीत ‘ईडी’कडे तक्रार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट लिमिटेड कंपनीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीतील ‘ईडी’ कार्यालयात जाऊन तक्रार केली. स्मार्ट सिटीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे बारणे यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत 700 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता खासदार बारणे यांनी थेट ईडीच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली आहे.

भाजपच्या ताब्यात असलेल्या महापालिकेतील स्मार्ट सिटी योजनेत 700 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेकडून केला आहे. भ्रष्टाचारात स्थानिक पुढारीही सहभागी असल्याचा आरोप केला. भाजपच्या मुंबईतील एका आमदाराच्या कंपनीवर आरोप केला आहे. 2018-19 मध्ये स्मार्ट सिटी योजनेसाठी क्रिस्टल इंटरग्रेटडे सर्व्हिस लिमिटेड कंपनीला 500 कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे.

मात्र, टेंडर आणि यातील कंडिशन क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी करण्यात आली. ‘या कंपनीला 500 कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, त्यांनी 50 टक्के सुद्धा काम केले नाही. त्यामुळे या कंपनीने स्पष्टपणे सरकारचा आणि जनतेचा पैसा पाण्यात बुडवला आहे. या कंपन्यांनाच कंत्राटाचा जास्त फायदा झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता.

या भ्रष्टाचाराची ईडीकडे तक्रार करण्याची विनंतीही त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यां यांना केली होती. आता शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज थेट दिल्लीतील ईडीचे कार्यालय गाठले. स्मार्ट सिटीतील कथित भ्रष्टाचाराची तक्रार केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.