Ravet: ‘बंधा-यात मिसळणारे मैलामिश्रित पाणी रोखा, शहरवासीयांना स्वच्छ पाणीपुरवठा करा’

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी उचलत असलेल्या रावेत बंधा-यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. महापालिका ज्या ठिकाणाहून पाण्याचा उपसा करते. त्याठिकाणी मैलामिश्रीत पाणी नदीपात्रत जात असल्याने जलपर्णी निर्माण झाली आहे. पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. त्यामुळे रावेत बंधा-यात मैलामिश्रित सांडपाणी मिसळणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात. नदीतील जलपर्णी काढून शहराला पूर्णपणे स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडकरांना मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका रावेत बंधा-यातून पाणी उचलते. या बंधा-यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. महापालिका ज्या ठिकाणाहून पाण्याच्या उपसा करते. त्याठिकाणी मैलामिश्रीत पाणी नदीपात्रत जात असल्याने मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाली आहे. पाणी पिण्यायोग्य नाही.

यामुळे शहरातील लाखो नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेने नागरिकांच्या जिवाशी खेळणे बंद करावे. रावेत बंधारा परिसरातील मैला मिश्रित पाणी बंद करावे. मैलामिश्रित सांडपाणी मिसळणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात. बंधा-यांतील जलपर्णी काढावी. शहराला पूर्णपणे स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा सूचना खासदार बारणे यांनी केल्या आहेत. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.