Vadgaon Maval : खासदार श्रीरंग बारणे यांची वडगावमधील गणेशोत्सव मंडळांना सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी वडगाव मावळ मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सदिच्छा भेट दिली.रविवारी (दि. 4) दिलेल्या या भेटी दरम्यान त्यांनी वडगावमधील नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे, अशी प्रार्थना श्री गणराया चरणी केली.

मावळ लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय, कार्यक्षम खासदार, संसद रत्न श्रीरंग आप्पा बारणे यांनी रविवारी (दि. 4) वडगावमधील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना सदिच्छा भेटी दिल्या आणि वडगावमधील नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे, असा आशीर्वाद श्री गणपती रायांच्या चरणी मागितला.

याप्रसंगी माजी जि. प. सदस्य चंद्रशेखर भोसले, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, तालुका शिवसेना प्रमुख राजु खांडभोर, शिवसेना नेते बाळासाहेब वाल्हेकर, माजी उपसभापती  शरद हुलावळे, अंकुश देशमुख,  वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, युवक अध्यक्ष विनायक भेगडे आदिसह वडगावमधील आजी, माजी सरपंच, उपसरपंच व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक मंडळाने फटाके वाजवून खासदार आप्प्पा बारणे यांचे स्वागत केले आणि मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी खासदार यांच्या बरोबर फोटो घेण्याचा आनंद घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.