गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Navale Bridge Accident : खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले ब्रिजवर होणाऱ्या अपघाताचा मुद्दा लोकसभेत मांडला

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी पुण्याच्या नऱ्हे भागातील नवले पुलाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.

याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, नवले ब्रिजवर वारंवार अपघात होत आहेत. 2021 सालापासून 14 जणांचा अपघातामध्ये मृत्यु झाला तर 24 जण गंभीररित्या जखमी झाले. नुकत्याच झालेल्या अपघाताविषयी आणि त्यात झालेल्या नुकसानाविषयीही माहिती त्यांनी दिली. येथे असलेल्या सर्व्हिस रोडवरील वाहतूक व वाढत्या रहदारीमुळे अपघाताचे प्रमाण वाढते आहे.

पुणे महानगरपालिकेतर्फे योग्य त्या उपाययोजना करूनही अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्गाविषयी सवाल उपस्थित केले. शासनाने यामध्ये लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करण्याची विनंती केली.

 

Latest news
Related news