Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज होतील : सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावरून महा विकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. त्या प्रश्नावर आज खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की,पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pune News) यांनी नेहमी सांगितले आहे. कोणाच्याही नावावर योजना आणू नका आणि त्यांच्या नावावर तर करू नका असा आग्रह आहे. तसेच काही कुटुंबाची नाव देण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला विरोध दर्शविला होता.पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री या पदाच्या नावाने योजना तयार करा.मी ‘नामो’ नावाची योजना वाचल्यानंतर एक चिंता वाटते .ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज होतील. अशी प्रतिक्रीया सुप्रिया सुळे यांनी दिली.

 

Alandi New : आळंदी मध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सर्व गोष्टी आवडत नाही.तसेच ‘नामो’ नावाची योजना कशी काढली.याबाबत काहीच समजल नसून त्याबद्दल आश्चर्य वाटत आहे. (Pune News) तसेच काही योजना बद्दल सरकाराच अभिनंदन,पण तुमच्याकडे तेवढा निधी आहे का असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.

मी ‘त्या’ निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त करते : सुप्रिया

शेतकर्‍यांना जात विचारली जात आहे.त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी आहे.त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,ही बाब धक्कादायक असून देशातील कोणत्याही शेतकर्‍याला (Pune News) आजपर्यंत कधीही जात विचारली गेली नाही.तसेच मी या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त करते आणि तो निर्णय मागे घेतला पाहिजे.यामागे नक्किच काही तरी कटकारस्थान असण्याची शक्यता आहे. त्या प्रश्नावर संसदेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.