MPSC EXAM : एमपीएससी उमेदवारांना तीन पदरी मास्क बंधनकारक

परिक्षेसाठी एसओपी जाहीर 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी (दि. 21) होणार आहे. या परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांना तीन पदरी मास्क परिधान करणे बंधनकारक आहे तसेच, परीक्षागृहात वारंवार सॅनिटायझरचा वापर करणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. आयोगाने परिक्षेसाठी एसओपी जाहीर केली आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोगाकडून मानक कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कोविड- 19 ची लक्षणे असलेल्या उमेदवारांनी उपकेंद्रावरील पर्यवेक्षीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची आगाऊ कल्पना देणे गरजेचे आहे.

जेणेकरून उमेदवारांना मुखपट्टी, हातमोजे, फेसशील्ड, मेडिकल गाऊन, शु कव्हर, मेडिकल कॅप इत्यादी असलेले पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच त्या परीक्षार्थी उमेदवाराची स्वतंत्र कक्षात व्यवस्था करण्यात येईल.

शारीरिक अंतर राखण्याच्या आनुषंगाने विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणे अनिवार्य असून, वापरलेले टिश्यू, मास्क, सॅनिटायजर्सची बाटली इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कचराकुंडीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रविवारी होणाऱ्या राज्य सेवा सेवा पूर्व परीक्षेसाठी राज्यात 800 केंद्रे आहेत. तब्ब्ल 2 लाख 83 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.