MPC News Anniversary : एमपीसी न्यूजची 14 वर्षे… 210 देश, 9160 शहरे आणि पावणेदोन कोटी युनिक व्हिजिटर्स!

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – ‘स्मार्ट सिटी’ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट मीडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एमपीसी न्यूज’ या शहरातील पहिल्या मराठी न्यूज पोर्टलने 14 वर्षांची वाटचाल (MPC News Anniversary) यशस्वीपणे पूर्ण करून नुकतेच 15 व्या वर्षात पदार्पण केले आहे. दोन सर्वसामान्य पत्रकारांनी लावलेले हे रोपटे आता चांगलेच फोफावले आहे. एका वाक्यात सांगायचे झाले तर एमपीसी न्यूजची 14 वर्षे… 210 देश, 9160 शहरे, पावणेदोन कोटी युनिक व्हिजिटर्स आणि अब्जावधी व्हिजिट्स! 

एखाद्या संस्थेच्या जीवनात 14 वर्षे हा काळ काही फार मोठा नसतो, याची आम्हालाही जाणीव आहे. पण या अल्पावधीत आपल्या सर्वांचा भक्कम पाठिंबा आणि शुभेच्छा यामुळे आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची अत्याधुनिक मीडिया हाऊसची गरज पूर्ण करू शकलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

मराठी वेबसाईटचा इतिहास साधारणतः सप्टेंबर 1996 पासून सुरू झाल्याचे दिसून येते. पहिले मराठी न्यूज पोर्टल 1998 मध्ये सुरू झाल्याची नोंद आढळून येते. फॉन्ट डाऊनलोड करावा लागणाऱ्या वेबसाईट, डायनॅमिक एनकोडिंगमधील वेबसाईट आणि युनिकोडमधील वेबसाईट अशी स्थित्यंतरे मराठी वेबसाईट्सच्या इतिहासात दिसून येतात.

Special Editorial : विशेष संपादकीय – दिल है छोटासा, छोटीसी आशा…

बरोबर 14 वर्षांपूर्वी म्हणजे 22 जुलै 2008 ला आम्ही ‘माय पिंपरी चिंचवड डॉट कॉम’ या नावाने शहरातील पहिले सिटी न्यूज पोर्टल सुरू केले. त्यावेळी ‘ऑनलाईन मीडिया’ या शहरवासीयांसाठी पूर्णपणे नवीन होता. शहरात ऑनलाईन मीडिया रुजवण्यापासूनचे आव्हान तेव्हा आमच्यापुढे होते.

निर्भिड, निष्पक्षपाती आणि विश्वासार्ह पत्रकारिता करीत एमपीसी न्यूजच्या टीमने हे आव्हान केवळ स्वीकारलेच नाही तर समर्थपणे पेलले आहे. एमपीसी न्यूजचे (MPC News Anniversary) अनुकरण करीत त्यानंतर शहरात सुमारे दोन डझन न्यूज पोर्टल सुरू झाली आहेत, हे ‘एमपीसी न्यूज’च्या यशाचे प्रमाण आहे, हे आम्ही नम्रतापूर्वक सर्वांच्या निदर्शनास आणू देऊ इच्छतो.

210 देश, 9160 शहरे आणि पावणेदोन कोटी युनिक व्हिजिटर्स!

पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील स्थानिक घडामोडींचा वेध घेणारे हे न्यूज पोर्टल इंटरनेटच्या जाळ्यातून जगभर पसरेल, याची पुसटशीही कल्पनाही आम्हाला 14 वर्षांपूर्वी नव्हती. शहर व जिल्ह्यातील लोकांना हव्या असणाऱ्या लोकल ब्रेकिंग न्यूज आम्ही देत गेलो. आणि या परिसराशी संबंधित मात्र जगभर विखुरलेले नेटीझन्स एमपीसी न्यूजला जोडले जाऊ लागले.

75th Independence Day: …आता वाटचाल सुराज्याकडे!

जगभरातील 210 देशांतील 9160 शहरांमधील तब्बल 1 कोटी 76 लाख 75 हजार 743 वाचकांपर्यंत (युनिक व्हिजिटर्स) पोहचण्याचे आणि त्यांच्या पसंतीस उतरण्याचे तसेच विश्वासास पात्र ठरण्याचे भाग्य एमपीसी न्यूजला मिळाले आहे. शहर व परिसराची बित्तंबातमी देणारी अग्रगण्य वृत्तसेवा म्हणून एमपीसी न्यूजचा नावलौकिक झाला आहे.

देशातील पहिल्या 200 न्यूज पोर्टल्समध्ये स्थान !

डिजिटल विश्वात एमपीसी न्यूजचे स्थान जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ‘सिमिलर वेब डॉट कॉम’ या जगभरातील वेबसाईट्सचा तुलनात्मक डेटा गोळा करणाऱ्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यानुसार जगातील सर्वप्रकारच्या वेबसाईटमध्ये एमपीसी न्यूजची क्रमवारी म्हणजेच ग्लोबल रँकिंग 38892 आहे. देशभरातील सर्व प्रकारच्या वेबसाईट्स म्हणजे एमपीसी न्यूजची क्रमवारी म्हणजेच कंट्री रँकिंग 2242 इतके आहे. देशातील सर्व भाषांमधील न्यूज पोर्टल्समध्ये एमपीसी न्यूजची क्रमवारी 168 आहे. देशातील पहिल्या 200 न्यूज पोर्टल्समध्ये स्थान मिळवू शकलो, याचा आमच्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.

सुरूवातीला महिन्याला काही हजार हिट्स मिळायच्या आता महिन्याला काही कोटी हिट्स मिळतात, याचे सर्व श्रेय आम्ही आमच्या दर्शकांना देतो.

आधुनिकता आणि नावीन्याचा ध्यास घेऊन 2008 पासून शहरवासीयांची सेवा करणाऱ्या टीम एमपीसी न्यूजने मोबाईल क्रांतीनंतरची गरज लक्षात घेऊन एसएमएस न्यूज अलर्ट्‌स सेवा सुरू केली.

Raaga Palace: पिंपरी-चिंचवडकरांच्या उदंड प्रतिसादानंतर रागा पॅलेसचा आणखी एक बैंक्वेट हॉल शहरवासियांच्या दिमतीला

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत फेसबुक पेज, व्हॉट्स अ‍ॅप बुलेटीन, ट्वीटर, यूट्यूबच्या माध्यमातून शहरातील ताज्या घडामोडींबाबत जगाला अपडेट ठेवण्याची कामगिरी केली. यावर्षी टेलिग्राम आणि इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरही आपले स्थान निर्माण केले आहे.

बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन स्थानिक बातम्या देणारे एमपीसी न्यूज (MPC News Anniversary) हे शहरातील पहिले मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू करण्याचा मानही आम्हाला मिळाला. आम्ही गेली दोन वर्षे सकाळी ताज्या बातम्या देणारे ऑडिओ बुलेटीन प्रसारित करीत असल्यामुळे बातम्यांचे श्रवण करण्याचा आनंदही आमच्या श्रोत्यांना उपलब्ध झाला आहे.

पॉडकास्ट आणि व्हिडिओ बुलेटीन

वाचकांच्या मागणीनुसार आम्ही दररोज सकाळी एमपीसी न्यूज पॉडकास्ट हे दिवसभरातील ठळक घडामोडींचा धावता आढावा घेणारे ऑडिओ बुलेटीन प्रसारित करतो. व्हिडिओ न्यूजचे प्रमाणही हळूहळू वाढवत आहोत. मल्टीमीडियाचा वापर करून आम्ही दर्शकांना मोठ्या विश्वासाने ग्वाही देऊ इच्छितो, राहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही!

नागरिकांच्या सुख-दुःखात साथ देणारा हक्काचा सोबती, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराचा आरसा, कोणत्याही पुढाऱ्याचा अथवा राजकीय पक्षाचा नव्हे तर सर्वसामान्य जनतेचा आवाज असणारे ‘एमपीसी न्यूज डॉट इन’ हे न्यूज पोर्टल आता पुणे व पिंपरी-चिंचवडकरांचा जणू ऑनलाईन ‘जीवनसाथी’ बनले आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे होणार नाही. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे एमपीसी न्यूजने उघडकीस आणली तसेच धसासही लावली. पर्यावरण रक्षणासाठी देखील एमपीसी न्यूजने वेळोवेळी कडक भूमिका घेतल्याचे आपण जाणताच.

Pavana Dam Lighting: पवना धरण तिरंग्याच्या रंगसंगतीत विद्युत रोषणाईने नटले

हाडाच्या पत्रकारांनी सर्वसामान्यांसाठी सिटी न्यूज पोर्टल चालविण्याच्या या प्रयोगाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. एमपीसी न्यूज (MPC News Anniversary) हे मंथन राष्ट्रीय पारितोषिक विजेते शहरातील एकमेव सिटी न्यूज पोर्टल आहे, ही बाबही अभिमानास्पद आहे.

गेल्या 14 वर्षांच्या काळात आम्ही सहा वेळा एमपीसी न्यूजला नवीन चेहरा दिला. अधिक आकर्षक मांडणी असलेले यूजर फ्रेंडली न्यूज पोर्टल विकसित करण्यासाठी आमचे सातत्याने नवनवीन प्रयोग सुरू असतात.

स्थानिक बातम्यांबरोबर राज्यातील व देश-विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा देण्यास तसेच मनोरंजन, लाईफस्टाईल, क्रीडा, तंत्रज्ञान अशा जीवनाच्या विविध अंगांशी संबंधित लेख आणि माहिती देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे एमपीसी न्यूजच्या वाचकप्रियतेत अधिकच भर पडली आहे.

शिक्षण संवाद, कला संवाद आणि एमपीसी न्यूज इव्हेंट्स

एमपीसी न्यूजने गेल्या वर्षभरात शिक्षण संवाद व कला संवाद ही दोन व्यासपीठे सुरू केली आहेत तसेच एमपीसी न्यूज इव्हेंट्स हे नवे दालन खुले आहे. काऊंटडाऊन दहावी, पुरुषोत्तम डेज, रक्षक मातृभूमीचे, आम्ही चालवू हा पुढे वारसा या सारखे दर्जेदार ऑनलाईन आणि ऑफलाईन कार्यक्रम आमच्या दर्शकांच्या पसंतीस उतरले. यापुढेही आम्ही अधिकाधिक दर्जेदार कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येणार आहोत.

जर्नालिझम स्कूल

एमपीसी न्यूज (MPC News Anniversary) ही पत्रकारितेचे प्रशिक्षण देणारे जर्नालिझम स्कूल म्हणूनही ओळखले जाते. गेल्या 14 वर्षांत एमपीसी न्यूजमध्ये पत्रकारितेचे धडे घेतलेले शंभरहून अधिक पत्रकार विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच न्यूज पोर्टल्समध्ये काम करीत आहेत. काहींनी तर स्वतःची न्यूज पोर्टल्स देखील सुरू केली आहेत. पत्रकारिता करण्याबरोबरच पत्रकार घडविण्याचे काम देखील आमच्याकडून घडत आहे.

Bhosale Pride : ‘भोसले प्राईड’मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त खास ऑफर, फ्लॅट बुकिंगवर स्टॅम्प ड्यूटी आणि नोंदणी शुल्क माफ

स्मार्ट सिटीमधील या स्मार्ट मीडिया हाऊसच्या यशामध्ये आपण सर्व वाचक, दर्शक, हितचिंतक, जाहिरातदार, तांत्रिक सल्लागार, पत्रकार सहकारी व अन्य टीम मेंबर असे आपण सर्वजण बरोबरीचे भागीदार आहात. आपल्या भक्कम पाठबळाशिवाय ही आव्हानात्मक वाटचाल केवळ अशक्य होती. त्यामुळे 14 वा वर्धापनदिन साजरा करीत असताना आपणा सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे आमचे कर्तव्य आहे. आमच्यावरील आपला विश्वास आणि प्रेम असेच पुढे राहू देत, हीच विनम्र अपेक्षा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.