Pimpri : ‘एमपीसी न्यूज’ची दशकपूर्ती ; ‘एमपीसी न्यूज’ बद्दलचा अनुभव पाठविण्याचे वाचकांना आवाहन

एमपीसी न्यूज – आधुनिकता आणि नावीन्याचा ध्यास घेऊन 2008 पासून शहरवासीयांची सेवा करणारे शहरातील पहिले व अग्रगण्य ‘एमपीसी न्यूज’ पोर्टल 22 जुलै 2018 रोजी 11 व्या वर्षात पर्दापण करत आहे. हा पल्ला केवळ वाचकांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आम्ही गाठू शकलो आहेत. त्यामुळे दशकपूर्तीनिमित्त ‘एमपीसी न्यूज’ बद्दलचा अनुभव शेअर करण्याची संधी आम्ही वाचकांना देत आहोत. वाचकांनी आपला अनुभव लिखित स्वरुपात आपल्या छायाचित्रासह आमच्याकडे पाठवावे असे आवाहन, ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार यांनी केले आहे. वाचकांच्या प्रतिक्रियांना ‘एमपीसी न्यूज’वर योग्य ती प्रसिद्धी देण्यात येईल.

बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजे 22 जुलै 2008 ला माय पिंपरी-चिंचवड डॉट कॉम या नावाने शहरातील पहिले सिटी न्यूज पोर्टल सुरू केले. त्यावेळी ऑनलाईन मीडिया या शहरवासीयांसाठी पूर्णपणे नवीन होता. शहरात ऑनलाईन मीडिया रुजवण्यापासूनचे आव्हान तेव्हा होते. निर्भिड, निष्पक्षपाती आणि विश्वासार्ह पत्रकारिता करीत ‘एमपीसी न्यूज’च्या टीमने हे आव्हान केवळ स्वीकारलेच नाही तर समर्थपणे पेलले आहे.

एमपीसी न्यूजने दहा वर्षांचा पल्ला गाठला आहे. 22 जुलै 2018 रोजी ‘एमपीसी न्यूज’ 11 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. वाचक, दर्शक, हितचिंतक , जाहिरातदार यांच्या भक्कम पाठबळामुळेच ही वाटचाल आहे. त्यामुळे एमपीसी न्यूजच्या वाचकांना गेल्या दहा वर्षात आलेला अनुभव शेअर करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. ‘एमपीसी न्यूज’चा शहरातील ताज्या घडामोडी कळण्यासाठी किती फायदा झाला. याचा वाचकांनी आपला अनुभव आपल्या छायाचित्रासह आमच्याकडे लिखित स्वरुपात पाठवावा. त्याला योग्य ती प्रसिद्धी देण्यात येईल.

आपला अनुभव आपण आपल्या छायाचित्रासह आमच्या [email protected] या ई-मेलवर अथवा 9011050001, 9011050005 या व्हॉट्सअॅपवर पाठवू शकता. तसेच पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकामागे असलेल्या भक्ती कॉम्प्लेक्स मधील ‘एमपीसी न्यूज’च्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन दिले तरी चालतील.

"madigeri

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.