MPC News Event: पाहा… ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ संपूर्ण कार्यक्रम

एमपीसी न्यूज – भारताला उज्ज्वल ऐतिहासिक वारसा आहे. हा ऐतिहासिक वारसा लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. (MPC News Event) पण, इतिहास लोकांसमोर मांडण्याऐवजी नको ते विषय मांडले जातात. उज्ज्वल इतिहास लोकांसमोर आणण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. इतिहासाला रंजक पद्धतीने लोकांसमोर मांडणार आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याचा माझा ध्यास आहे. मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत भारतीय कला, संस्कृतीचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी दिली.

एमपीसी न्यूज ‘कला संवाद’ आयोजित (Watch MPC News Event) ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ या दृकश्राव्य व प्रकट मुलाखतींच्या  कार्यक्रमात ऐतिहासिक चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांची निर्मितीबाबत देसाई बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी (25 जून) झालेल्या कार्यक्रमात नामवंत मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी देसाई, ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर, अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याशी संवाद साधला.

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्यापासून आत्तापर्यंतच्या ऐतिहासिक चित्रपट, नाटके व दूरचित्रवाणी मालिकांच्या प्रवासाचा चित्रफितींच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत उपस्थित रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

पाहा… ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ कार्यक्रमाचा पूर्वार्ध

 

पाहा… ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ कार्यक्रमाचा उत्तरार्ध

 

MPC News Event : भारताच्या उज्ज्वल ऐतिहासिक वारशांची नवीन पिढीला ओळख होणे गरजेचे – नितीन चंद्रकांत देसाई

Maharashtra Political Crisis : 30 तारखेला राज्यपालांकडून विशेष अधिवेशन? भाजप राज्यपालांना बहुमत चाचणीसाठी पत्र 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.