Mpc News Event: ‘देवीचा जागर प्रश्नमंजुषा’ स्पर्धेतील विजेत्यांना उत्साहात पारितोषिक वितरण

एमपीसी न्यूज – शारदीय नवरात्र उत्सावानिमित्त ‘एमपीसी न्यूज’च्या वतीने घेण्यात आलेल्या देवीचा जागर प्रश्नमंजुषा 2022 या ऑनलाइन स्पर्धेला (Mpc News Event) राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील नऊ भाग्यवान आणि नऊ भाग्यवान महाविजेत्यांना चांदीचा करंडक, प्रशस्ती प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तळेगाव दाभाडे येथील भगवती ज्वेलर्स यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले होते.

चिंचवड येथील ‘एमपीसी न्यूज’च्या कार्यालयात (Mpc News Event) आज (शनिवारी) मोठ्या उत्साहात हा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. भगवती ज्वेलर्सच्या संचालिका प्रियंका मालपाठक, नितीश मालपाठक, नामवंत उद्योजक राजेंद्र गावडे, निवृत्त बालवाडी विभागप्रमुख विजया इनामदार, शकुंतला गावडे, तृषा अमित गावडे, ‘एमपीसी न्यूज’चे मुख्य संपादक विवेक इनामदार यांच्या हस्ते बक्षीस देवून विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. ‘एमपीसी न्यूज’चे सहयोगी संपादक अनिल कातळे, फिचर्स व आर अँड डी विभागाचे संपादक राजन वडके उपस्थित होते.

Mpc News Event

‘एमपीसी न्यूज’ने भगवती ज्वेलर्सच्या सहकार्याने नवरात्र उत्सवानिमित्त यंदा प्रथमच देवीचा जागर प्रश्नमंजुषा ही स्पर्धा घेतली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही स्पर्धा घेण्यात आली. या नऊ दिवसांच्या स्पर्धेला मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत 8 हजार 120 स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातील 5 हजार 26 जणांनी अचूक उत्तरे दिली.

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांना मोठा दिलासा, फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल?

त्यामुळे दररोज बरोबर उत्तर देणा-या स्पर्धकातून एक भाग्यवान विजेता असे नऊ आणि नऊ दिवसांतील 27 प्रश्नांची बरोबर उत्तर देणारे भाग्यवान महाविजेते नऊ अशा 18 विजेत्यांची निवड करण्यात आल्याचे ‘एमपीसी न्यूज’चे मुख्य संपादक विवेक इनामदार यांनी प्रस्ताविकात सांगितले. तसेच ‘एमपीसी न्यूज’च्या मागील 14 वर्षातील कार्याचा आढावाही त्यांनी सांगितला.

Mpc News Event

भगवती ज्वेलर्सचे नितीश मालपाठक म्हणाले, ”एमपीसी न्यूजच्या माध्यमातून एक सांस्कृतीक व्यासपीठ (Mpc News Event) उपलब्ध करुन देण्याची संधी आम्हाला मिळाली. या स्पर्धेला  भरभरुन प्रतिसाद मिळाला. विजेत्यांचे मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो”. स्पर्धकांच्या वतीने बोलताना डॉ. श्रीकांत माडीवाले म्हणाले, ”देवीचा जागर प्रश्नमंजुषा ही अतिशय चांगली स्पर्धा ‘एमपीसी न्यूज’ने घेतली. या स्पर्धेसाठी मोठी यंत्रणा काम करत होती. उत्तरे देताना स्पर्धाकांचाही घाम निघाला. मला सौभाग्यवतीमुळे मंचावर बोलण्याची संधी मिळाली. सर्व स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन करतो”.

Mpc News Event

नऊ दिवसांचे नऊ विजेते

पहिल्या दिवशी संध्या सोमनाथ चिंचवडे भाग्यवान विजेत्या ठरल्या. दुसरा दिवस शुभांगी ठोके, तिसरा दिवस शैलेश रामचंद्र राणे, चौथा दिवस सुजाता दिनकर निंबळे, पाचवा दिवस प्रीती श्रीकांत माडीवाले, सहावा दिवस विनायक नरहरी कुलकर्णी, सातवा दिवस स्नेहल सौरभ वाणी, आठवा दिवस माधुरी देशकुलकर्णी आणि नवव्या दिवसाचे अरुण विठ्ठल चव्हाण हे भाग्यवान विजेते ठरले.  प्रीती माडीवाले या काही कारणामुळे गैरहजर होत्या. त्यांच्या वतीने त्यांचे पती डॉ, श्रीकांत माडीवाले यांनी पुरस्कार स्वीकारला. या नऊ भाग्यवान विजेत्यांना चांदीचा करंडक आणि प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.

Mpc News Event

सर्वच म्हणजेच 27 प्रश्नांची अचूक उत्तरे देणारे भाग्यवान महाविजेते

स्पर्धेतील नऊ दिवसांमधील 27 प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-या भाग्यवान महाविजेत्यांचाही गौरव (Mpc News Event) करण्यात आला. त्यात सपना संदीप खटके, अश्विनी अविनाश भोसले, अजय विनायक माने, भगवान पाणीग्राही, साक्षी महेश म्हस्के, सीमा जग्गू राठोड, किशोर शाहू मुजमुले, नेहा विजय बिर्जे आणि अमृता तन्मय शिंदे हे नऊ जण भाग्यवान महाविजेते ठरले. त्यांचाही चांदीचा करंडक आणि प्रशस्तीपत्रक देवून गौरव करण्यात आला.

त्याचबरोबर स्पर्धेसाठी प्रश्न संकलनाचे काम केलेले ‘एमपीसी न्यूज’चे वरिष्ठ वार्ताहर प्रभाकर तुमकर, संगीता तुमकर आणि स्पर्धेसाठी तांत्रिक सहाय्य करणारे ‘एमपीसी न्यूज’चे सदस्य, संगणक अभियंता भीम मागाडे, सोनाली मागाडे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमपीसीचे संपादक विवेक इनामदार यांनी केले. तर, सूत्रसंचालन सहयोगी संपादक अनिल कातळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रँड मॅनेजर अमोल गाडगीळ, मुख्य वार्ताहर गणेश यादव, वार्ताहर सिद्धार्थ गायकवाड, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे तसेच स्नेहा इनामदार यांनी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.