MPC News Exclusive : अबब! मंत्रालयाच्या झगमगाटावर दर महिन्याला 35 लाखांची उधळपट्टी

एमपीसी न्यूज (MPC News Exclusive) – राज्याची राजधानी असलेल्या मुंबई येथील मंत्रालयात दर महिन्याला लाखो रुपयांची वीज वापरली जात आहे. सौरउर्जा आणि वीजबजत आदी बाबींना फाटा देत वीजबिलावर प्रत्येक महिन्याला सुमारे 35 लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन च्या काळातील चार महिन्यांच्या वीज बिलांची आकडेवारी मंत्रालयाकडे उपलब्ध नाही.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी याबाबत मंत्रालयातील विद्युत विभागाकडे माहितीच्या अधिकारात मंत्रालयातील वीजबिलाबाबत माहिती मागवली होती. त्यात वीज बिलांची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. (MPC News Exclusive) मंत्रालयातील झगमगटावर होत असलेली जनतेच्या पैशाची उधळपट्टी त्वरित थांबवण्यात यावी, अशी मागणी प्रदीप नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

प्रदीप नाईक यांनी जानेवारी 2020 ते एप्रिल 2023 या कालावधीतील एकूण 40 महिन्यांची माहिती मागितली होती. मात्र यामध्ये केवळ 33 महिन्यांची माहिती देण्यात आली आहे.

सन 2020 मधील एप्रिल ते जुलै या चार महिन्यांची माहिती मंत्रालयाच्या विद्युत विभागाकडे उपलब्ध नाही. तर सन 2021 मधील एप्रिल महिन्याचे वीजबिल किती यावर देखील सांगण्यात आलेले नाही. सन 2023 मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोनच महिन्यांची माहिती देण्यात आली आहे.

Pune : पुण्यातील बांधकामांसाठी आता एसटीपीचे पाणी वापरणे बंधनकारक, अॅपद्वारे पुरवले जाणार पाणी

सन 2020 मध्ये मिळालेल्या आठ महिन्यांचे वीजबिल तीन कोटी 44 लाख 68 हजार 134 रुपये आहे. सन 2021 मधील मिळालेल्या 11 महिन्याचं वीजबिल तीन कोटी 68 लाख 45 हजार 148 रुपये आहे. सन 2022 या संपूर्ण वर्षाच्या वीजबिलाचा आकडा देण्यात आला आहे. या वर्षाचे वीजबिल चार कोटी 64 लाख 89 हजार 852 रुपये आहे. तर चालू वर्षातील पहिल्या दोन महिन्याचे वीजबिल 60 लाख 78 हजार 490 रुपये आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक म्हणाले, “मंत्रालयाच्या इमारतीत दररोज (MPC News Exclusive) तब्बल एक लाख रुपयांहून अधिक किमतीची वीज वापरली जात आहे.सर्वसामान्य जनतेच्या कररूपी पैशांमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी होत आहे. यावर अंकुश लावणे आवश्यक आहे. सौरउर्जा आणि इतर माध्यमातून विजेचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”

मागील चार वर्षाचे सरासरी वीजबिल –

सन                          वीजबिल (रुपयांमध्ये)
20205 कोटी 17 लाख दोन हजार 192
20214 कोटी एक लाख 94 हजार 696
20224 कोटी 64 लाख 89 हजार 852
2023 (एप्रिल पर्यंत)1 कोटी 21 लाख 56 हजार 980

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.