MPC News Impact : आळंदी जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचऱ्याची सफाई

एमपीसी न्यूज – ‘आळंदी जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरच कचऱ्याचा ढीग’ या एमपीसी न्यूजने दिलेल्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने त्या रस्त्यावरील पसरलेल्या कचऱ्याची आज (शनिवारी) बऱ्याच प्रमाणात सफाई (MPC News Impact) केल्याचे दिसून आले.

आळंदी जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या पुलावरील रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग पसरलेला होता. तेथील पसरलेल्या कचऱ्याच्या ढिगा मुळे येथील  रस्ता अरुंद झालेला दिसून येत होता. येथून ये-जा करताना नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते.

Swachh Bharat Mission : ‘सिटीझन फीडबॅक’मध्ये पिंपरी-चिंचवड देशात अव्वल; सर्वेक्षणात 19 वा क्रमांक

परिसरात या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली होती.परिणामी नागरिकांना या रस्त्यावरून जाताना नाक मुठीत धरून चालावे लागत होते. परंतु 30 सप्टेंबर रोजी आळंदी जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरच कचऱ्याचा ढीग असे एम पी सी न्यूज ने वृत्त प्रसारीत केले होते.

त्याची दखल घेत प्रशासनाने त्या रस्त्यावरील  पसरलेल्या कचऱ्याची बराचस्या प्रमाणात दि.1ऑक्टोबर रोजी सफाई केल्याची दिसून आली. तसेच पद्मावती रस्त्यावरील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पासून काही अंतरावर असणाऱ्या कचऱ्याची सफाई करण्यात आली आहे.संबंधित रस्त्यावरील व रस्त्याच्या कडेची सफाई केल्याबद्दल नागरिकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

आळंदी हद्दी लगत असणाऱ्या काही केळगावातील नागरिकांकडून आळंदी हद्दीमध्ये टाकण्यात येणाऱ्या कचऱ्या संदर्भात आळंदी नगरपरिषदे मध्ये नगरपालिका प्रशासन व ग्रामपंचायत यांची बैठक झाली होती.परंतु अद्याप ही त्यावर तोडगा निघालेला दिसून येत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.