MPC News Online Bappa : सत्यम ज्वेलर्सच्या वतीने पाच विजेत्यांना चांदीचे नाणे प्रदान

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूजच्या वतीने गणेशोत्सवात आयोजित केलेल्या ऑनलाईन बाप्पा (MPC News Online Bappa) या घरगुती गणपती सजावट स्पर्धेतील पाच विजेत्यांना स्पर्धेचे प्रायोजक सत्यम ज्वेलर्सच्या वतीने चांदीचे नाणे देऊन सन्मानीत करण्यात आले.

एमपीसी न्यूजने आयोजित केलेल्या या स्पर्धेस स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण 20 स्पर्धकांची चांदीचे नाणे या बक्षिसासाठी निवड झाली आहे. त्यापैकी पाच विजेत्यांना छोटेखानी समारंभात पारितोषिक प्रदान करण्यात आले.

सत्यम ज्वेलर्सचे प्रमुख किरणराज चोपडा व राहुल चोपडा तसेच चिखली शाखा प्रमुख नरेश कोठारी व चाकण शाखा प्रमुख मनोहर सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

या समारंभात पारितोषिक प्रदान करण्यात आलेल्या (MPC News Online Bappa) विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1) सागर घिगे, निगडी प्राधिकरण
2) मानसी महेश जाधव, दत्तवाडी, आकुर्डी
3) अभय गायकवाड, पुनावळे
4) लोकेश शंकर बडदे,ज्योतिबा कॉलनी, रहाटणी,काळेवाडी
5) कविता जोर्वेकर,वाकड निगडी प्राधिकरणातील रहिवासी सागर घिगे यांना सत्यम ज्वलर्सच्या निगडी शोरुममध्ये राहुल चोपडा यांच्या हस्ते चांदीचे नाणे प्रदान करण्यात आले.

MPC News Online Bappa

पुनावळे येथील अभय गायकवाड सत्यम ज्वलर्सच्या निगडी शोरुम मधून राहुल चोपडा यांच्या हस्ते चांदीचे नाणे देण्यात आले.

दत्तवाडी (आकुर्डी) येथील रहिवासी मानसी महेश जाधव यांना सत्यम ज्वेलर्सच्या चिखली शाखेचे प्रमुख नरेश कोठारी यांच्या ह्स्ते चांदीचे नाणे बक्षीस म्हणून देण्यात आले.

रहाटणी काळेवाडी येथील रहिवासी लोकेश शंकर बडदे यांनी सत्यम ज्वेलर्सच्या चाकण शाखेचे प्रमुख मनोहर सिंग यांच्या हस्ते चांदीचे नाणे स्वीकारले.

MPC News Online Bappa

वाकड येथील कविता जोर्वेकर यांना सत्यम ज्वलर्सच्या निगडी शोरुममध्ये किरणराज चोपडा यांच्या ह्स्ते चांदीचे नाणे देण्यात आले.

स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारल्याबद्दल एमपीसी न्यूजचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे यांनी सत्यम ज्वेलर्सचे विशेष आभार मानले.

Today’s Horoscope 14 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPC News Online Bappa स्पर्धेच्या उत्तम संयोजनाबद्दल सत्यम ज्वेलर्सचे राहुल चोपडा यांनी एमपीसी न्यूज टीमचे कौतुक केले.

सर्व विजेते व त्यांच्या कुटुंबीयांनी एमपीसी न्यूज व सत्यम ज्वेलर्सला या स्पर्धेच्या संयोजनाबद्दल धन्यवाद दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.