MPC News Online Bappa : शहा ज्वेलर्सच्या वतीने पाच विजेत्यांना चांदीचे नाणे प्रदान

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूजच्या वतीने गणेशोत्सवात आयोजित केलेल्या ऑनलाईन बाप्पा (MPC News Online Bappa) या घरगुती गणपती सजावट स्पर्धेतील पाच विजेत्यांना स्पर्धेचे प्रायोजक शहा ज्वेलर्सच्या वतीने चांदीचे नाणे देऊन सन्मानीत करण्यात आले.

एमपीसी न्यूजने आयोजित केलेल्या या स्पर्धेस स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण 20 स्पर्धकांची चांदीचे नाणे या बक्षिसासाठी निवड झाली आहे. त्यापैकी मावळ विभागातील पाच विजेत्यांना छोटेखानी समारंभात पारितोषिक प्रदान करण्यात आले.

शहा ज्वेलर्सच्या तळेगाव दाभाडे येथील शोरूममध्ये झालेल्या या कार्यक्रमास संचालक सागर शहा व भाविका शहा तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Today’s Horoscope 30 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

या समारंभात पारितोषिक प्रदान करण्यात आलेल्या (MPC News Online Bappa) विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
 
1)  योगेश राजेंद्र थोरात, तळेगाव दाभाडे
2) विजय शिवराम एरंडे, वतननगर, तळेगाव दाभाडे 
3) प्रशांत अविनाश कडवे, संस्कृत बिल्डिंग, तळेगाव दाभाडे  
4) रवी दत्ता केदारी, ताजे, मळवली 
5) रचना संदीप वर्तक, लोणावळा 
MPC News Online Bappa MPC News Online Bappa

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.