MPC News Online Bappa : ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाइन बाप्पा उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद (भाग शेवटचा)

एमपीसी न्यूज : ‘एमपीसी न्यूज ऑनलाइन बाप्पा‘ (MPC News Online Bappa) उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपल्या घरचा, गृहनिर्माण सोसायटीचा गणपती ‘एमपीसी न्यूज‘च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्याची त्याचबरोबर 25 विजेत्या स्पर्धकांना चांदीची नाणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.
नामवंत सुवर्णपेढी केडी सोनिगरा ज्वेलर्स, भांबुर्डेकर सराफ ज्वेलर्स आणि दिलीप सोनिगरा ज्वेलर्स हे या स्पर्धेचे प्रायोजक असून त्यांच्या वतीने 25 विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी एक चांदीचे नाणे देण्यात येणार आहे.
घराघरांत आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे ‘गणेशोत्सव‘. प्रत्येक घरी विशिष्ट विषयांवर आधारित आकर्षक सजावट केली जाते. बाप्पापुढे केल्या जाणा-या सजावटीमधून समाजात चांगला विचार पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. (MPC News Online Bappa) याच प्रयत्नांना ‘एमपीसी न्यूज‘ बळ देणार आहे. प्रत्येकाच्या घरातील बाप्पा ‘एमपीसी न्यूज‘च्या माध्यमातून (MPC News Online Bappa) संपूर्ण जगभर दाखवले जाणार आहेत.
आपल्या घरातील, गृहनिर्माण सोसायटीतील अथवा आपल्या कार्यालयातील बाप्पांचा, गणेशोत्सवातील सजावटीचा फोटो, आपले नाव आणि पत्यासह mpcnews.in या आमच्या अग्रगण्य मराठी वेब पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. त्याचबरोबर या उपक्रमात सहभागी होणाऱ्या 25 स्पर्धकांना प्रत्येकी एक चांदीचे नाणे देखील देण्यात येणार आहेत.













































