MPC News Quiz 5 : ‘देवीचा जागर प्रश्नमंजुषा – भगवती ज्वेलर्सच्या वतीने बक्षिसांचा डबल धमाका! जिंका तब्बल चांदीचे 18 करंडे 

एमपीसी न्यूज : एमपीसी न्यूजने आयोजित केलेल्या  ‘देवीचा जागर’ या ऑनलाईन प्रश्नमंजुषेला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बक्षिसांची संख्या दुपटीने (MPC News Quiz 5) वाढविण्याचा निर्णय स्पर्धेचे प्रायोजक तळेगाव दाभाडे येथील ‘भगवती ज्वेलर्स’च्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. आता स्पर्धेत नऊ ऐवजी 18 चांदीचे करंडे बक्षीस म्हणून देण्यात येतील.

सध्या या स्पर्धेत दररोज अचूक उत्तर देणाऱ्यांपैकी एका भाग्यवान विजेत्याला चांदीचा करंडा देण्यात येतो. या व्यतिरिक्त या स्पर्धेत सर्व दिवस सहभागी होऊन सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या नऊ महाविजेत्यांच्या नावांची घोषणा स्पर्धेच्या शेवटी म्हणजेच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर केली जाईल. चांदीचा करंडा जिंकण्याची संधी दवडू नका. स्पर्धेत शेवटपर्यंत सहभाग कायम ठेवा, असे आवाहन भगवती ज्वेलर्सचे प्रमुख शिरीष मालपाठक यांनी केले आहे.

प्रश्नमंजुषा प्रवेशिका भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

 

https://forms.gle/bCd3m5V697XDhee58

 

(आज दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी रात्री नऊपर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जातील)

 

या तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तरे देणाऱ्या स्पर्धकांमधून सोडत पद्धतीने एका भाग्यवान विजेत्याची निवड करून भाग्यवान विजेत्याला कुंकवाचा चांदीचा करंडा बक्षीस म्हणून देण्यात येईल.(MPC News Quiz 5) या स्पर्धेचा निकाल दररोज जाहीर करण्यात येईल. सर्व नऊ दिवस स्पर्धेत सहभागी होऊन सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या नऊ महाविजेत्यांची नावे दसऱ्याला जाहीर करण्यात येतील. पारितोषिक वितरण दसऱ्यानंतर चिंचवड येथे एमपीसी न्यूजच्या कार्यालयात करण्यात येईल.

 

नवरात्रौत्सव साजरा करीत असताना देवीच्या विविध रुपांविषयी, देवीच्या विविध स्थानांविषयी, देवीच्या पराक्रमांविषयी, देवीमहात्म्याविषयी, देवीच्या विविध कथांविषयी माहिती व्हावी,(MPC News Quiz 5) त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी लोकांनी अभ्यास करावा, या उद्देशाने ‘देवीचा जागर’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे एमपीसी न्यूजचे मुख्य संपादक विवेक इनामदार यांनी सांगितले.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची टीका अन् शिवाजीराव आढळराव पाटलांचे प्रत्युत्तर, वाचा काय झालं? 

 

या स्पर्धेत सर्व वयोगटातील, मुले-मुली, स्त्री-पुरुष, ज्येष्ठ नागरिक सहभागी होऊ शकतात. केवळ पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातून कोणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. एकाच कुटुंबातील एक किंवा अनेक सदस्य देखील सहभागी होऊ शकतात.

 

प्रत्येक दिवसाच्या प्रश्नांची सर्व उत्तरे अचूकपणे देणारे स्पर्धकच पारितोषिकासाठी पात्र ठरतील. पात्र स्पर्धकांच्या नावांमधून सोडत पद्धतीने दररोज एका भाग्यवान विजेत्याची निवड करण्यात येईल. या सर्व निवड प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

 

या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन नवरात्रौत्सवात दररोज देवीचा जागर करावा, असे आवाहन भगवती ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले आहे.

 

स्पर्धेसाठी पत्रकार प्रभाकर तुमकर यांनी प्रश्न संकलन केले असून भीम मागाडे यांचे तांत्रिक सहाय्य लाभले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.