MPC News Quiz Result 9 : ‘देवीचा जागर प्रश्नमंजुषा – दिवस आठवा… जाणून घ्या विजेत्याचे नाव!

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूज आयोजित ‘देवीचा जागर प्रश्नमंजुषा’ या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेला एमपीसी न्यूजच्या वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (MPC News Quiz Result 9) या स्पर्धेत दररोज एका भाग्यवान विजेत्याची निवड करण्यात आली असून त्याला स्पर्धेचे प्रायोजक च्या वतीने एक चांदीचा कुंकवाचा करंडा बक्षीस म्हणून देण्यात येईल. नवव्या दिवसाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त स्पर्धेत सहभागी होऊन एकूण 27 प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या नऊ महाविजेत्यांची नावे आज (बुधवारी) दुपारी जाहीर करण्यात येणार आहेत. या महाविजेत्यांनाही स्पर्धेचे प्रायोजक तळेगाव दाभाडे येथील ‘भगवती ज्वेलर्स’च्या वतीने एक चांदीचा कुंकवाचा करंडा बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

Pune news : मनपा सेवकांसाठी अंशदायी आरोग्य योजना रहावी, खाजगी विम्याचा घाट नको

या स्पर्धेत शेवटव्या दिवशी एकूण 696 स्पर्धक सहभागी झाले. (MPC News Quiz Result 9) त्यापैकी 188 स्पर्धकांनी तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. अचूक उत्तरे देणाऱ्या स्पर्धकांमधून संगणकीय सोडत पद्धतीने एका भाग्यवान विजेत्याची निवड करण्यात आली आहे.

 

नववा दिवस – भाग्यवान विजेता (चांदीच्या नवव्या करंड्याचे मानकरी)

अरुण विठ्ठल चव्हाण

शांती कॅम्पस सोसायटी, मुलुंड पश्चिम,

मुंबई, 400080

 

पारितोषिक वितरण येत्या शनिवारी (8 ऑक्टोबर) सकाळी 11.30 वाजता चिंचवड येथे एमपीसी न्यूजच्या कार्यालयात करण्यात येईल. (MPC News Quiz Result 9) त्याबाबत विजेत्यांशी संपर्क साधून माहिती देण्यात येईल. स्पर्धेसाठी पत्रकार प्रभाकर तुमकर यांनी प्रश्न संकलन केले होते. स्पर्धेसाठी भीम मागाडे यांचे तांत्रिक सहाय्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.