MPC News Special : ऑनलाइन टास्कच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी लुटले साडेपाच कोटी

एमपीसी न्यूज – डेबिट व क्रेडिट कार्ड, लिंकद्वारे बॅंक खाते हॅक करणे, लोन ऍप, सेक्‍सटॉर्शन यानंतर आता टास्कच्या माध्यमातून (MPC News Special )फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. ऑनलाइन टास्कच्या नावाखाली 1 जानेवारीपासून तब्बल 85 जणांची फसवणूक झाली आहे. या फसवणूकीच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी तब्बल साडेपाच कोटींची फसवणूक केली आहे.

व्हाटसअपच्या माध्यमातून नागरिकांना संपर्क केला जातो. आमच्या कंपनीच्या युट्युब चॅनल वरील पोस्ट लाईक केल्यास पैसे मिळतील, असे सांगितले जाते. त्यानंतर पुढे नागरिकांच्या खात्यात किरकोळ रक्कम जमा देखील केली जाते. व्हिडीओ लाईक केल्यास, तसेच चॅनल सबस्क्राईब केल्यास पैसे मिळतात अशी खात्री झाल्यानंतर त्यांना टेलिग्राम या सोशल मिडीयावर काही टास्क दिले जातात. अधिक पैसे कमवायचे असतील तर प्रीपेड टास्क आहेत. ते पूर्ण केल्यास तुम्हाला अधिक रक्कम मिळेल, असे आमिष दाखवले जाते.

Gahunje : सामाईक रस्ता बंद केल्याने दोघांवर गुन्हा

जानेवारी महिन्यापासून अशा प्रकारच्या फसवणुकीला सुरवात झाली आहे. मागील दोन महिन्यांमध्ये अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. आत्तापर्यंत सुमारे 85 जणांची साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ऑनलाइन टास्क हा प्रकार याच वर्षात नव्याने सुरू झाला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये बहुतांशजण हे उच्चशिक्षित तर काहीजण संगणक अभियंताही आहेत.

विश्वास संपादन करून प्रीपेड टास्क पूर्ण करण्यास सांगितले जाते. काही टास्क पूर्ण केल्यानंतर आणखी पुढचे टास्क दिले जातात. पुढील टास्क पूर्ण केले नाहीत तर आतापर्यंत गुंतवलेले सर्व पैसे बुडतील, अशी भीती दाखवली जाते. त्यामुळे काहीजण नाईलाजाने पैसे मिळतील या आशेने ते टास्क पूर्ण करतात. मात्र त्या नंतर नागरिकांशी संपर्क तोडला जातो. फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. या प्रकारांमध्ये उच्चशिक्षित तरुण-तरुणींची फसवणूक होण्याचे प्रमाण जास्त आहे.

दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सायबर सेलवर कामाचा प्रचंड ताण येऊ लागला आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस ठाणे स्तरावर देखील काही प्रकरणे दाखल होऊ लागली आहेत.

सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार म्हणाले, “उच्चशिक्षित तरुण-तरुणी दिवसातील खूप वेळ सोशल मीडियावर असतात. सोशल मिडियावरून अशा फसवणुकीची सुरुवात (MPC News Special ) होते. त्यामुळे अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.