MPC News Special : प्रभारी पोलीस अधिकारी रस्त्यावर दिसलेच पाहिजेत

पोलीस आयुक्तांच्या सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना

एमपीसी न्यूज – पोलीस प्रेझेन्स वाढविण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी रूटमार्च नंतर आता प्रभारी अधिकाऱ्यांना देखील रस्त्यावर थांबण्याच्या (MPC News Special) सूचना दिल्या आहेत. चौकाचौकांमध्ये पोलीस दिसले तर गुन्हेगारी, वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांना चाप बसेल हा यामागील आयुक्तांचा हेतू आहे. त्यानुसार पोलीस प्रभारी चौकाचौकांत थांबलेले दिसत आहेत.

शहर पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात पोलिसांचा वावर अधिक वाढला पाहिजे. चौकाचौकात, रस्त्यांवर पोलीस असतील तर स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी त्याचा सकारात्मक परिणाम होतो. पोलीस दिसल्यानंतर गुन्हेगार काही प्रमाणात शांतात बाळगतात. पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळेल या भीतीने गुन्हेगारांची वळवळ शांत होते. तसेच एखाद्या अनुचित प्रसंगी नागरिकांना तात्काळ पोलीस मदत घेता येते.

त्यामुळे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी रूटमार्च काढून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर आता प्रभारी अधिकारी देखील आपापल्या हद्दीत प्रमुख चौकांमध्ये, रस्त्यावर थांबतील, अशा सूचना दिल्या.

Nigdi : महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

वाहतूक विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देखील सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळी रस्त्यावर थांबण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. (MPC News Special) विरुद्ध दिशेने प्रवास करणे, भरधाव वेगात वाहन चालवणे, काळ्या काचा, बीआरटी मार्गातून प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरु आहे. प्रभारी अधिकारी चौकांमध्ये थांबल्याने या मोहिमांना वेग आला आहे.

चौकांमधील रिक्षा थांब्यावर काही रिक्षा चालक रिक्षात बसून मद्यपान करत असतात. रिक्षा आणि इतर वाहने रस्त्यावर पार्क केल्याने रस्ते अरुंद होतात आणि प्रसंगी वाहतूक कोंडी होते. (MPC News Special) प्रभारी अधिकारी चौकांमध्ये थांबले असतील तर कर्मचाऱ्यांनाही कामात हुरूप येत असल्याचे आयुक्तांना हा निर्णय काही प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.