MPC News Special : पोलीस ठाण्यातील अडगळ होणार दूर; वाहनांची लागणार विल्हेवाट

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस हद्दीतील पोलीस ठाण्यांमध्ये (MPC News Special) मागील अनेक दशकांपासून गुन्ह्यात जप्त केलेली, बिनधनी हजारो वाहने आहेत. या वाहनांनी पोलीस ठाण्यातील मोठा परिसर व्यापलेला आहे. पोलीस ठाण्यातील ही अडगळ दिवसेंदिवस वाढत आहे. ती कमी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी ठाणे प्रमुखांना आदेश दिले आहेत.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित 18 पोलीस ठाणी येतात. यातील बहुतांश पोलीस ठाण्याच्या आवारात बिनधनी आणि गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांचा खच पडला आहे. ज्यामुळे परिसरात अस्वच्छता आहे. यातील काही वाहने वर्षानुवर्ष या ठिकाणी धुळखात पडून आहेत. अपघातात क्षतीग्रस्त झालेली वाहने नेण्यासाठी मालक प्रयत्न करीत नाहीत. पोलीस ठाण्यांकडून देखील अशा वाहनांच्या निर्गतीसाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे ठाण्यांमध्ये धूळखात पडलेल्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पोलीस ठाण्याच्या आवारात वाहने पडून असल्याने परिसरातील सुशोभीकरण करण्यास बाधा येते. तसेच पोलीस ठाण्याला बकालपणा येतो. पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यात जप्त केलेल्या, तसेच वाहनांचा खच पडला आहे. याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ठाण्यातील वाहनांची विल्हेवाट लावण्याचे (MPC News Special) आदेश दिले आहेत.

Maharashtra : महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी ‘आप’चे प्रयत्न सुरू; स्वराज्य यात्रेचे आयोजन

पोलीस ठाण्यात बेवारस मुद्देमालाबाबत संपुर्ण माहीती अद्यावत करुन त्याची जास्तीत जास्त निर्गती करण्यात यावी, असे पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे. तसेच, 30 जून पर्यंत केलेल्या कार्यवाहीचा पुर्तता अहवाल सादर करण्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे.

मुद्देमाल वाटप करा –

चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा अशा घटनांमध्ये पोलीस आरोपींकडून मुद्देमाल जप्त करतात. हा मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करणे आवश्यक असते. मात्र वर्षानुवर्षे हा मुद्देमाल देखील मूळ मालकांना परत केला जात नाही. पोलीस स्टेशन मध्ये असलेला जास्तीत जास्त मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्यासाठी विशेष मोहीम घेणे गरजेचे आहे. हा मुद्देमाल वाटपाचा कार्यक्रम 15 जून पर्यंत पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामधील पोलीस उपआयुक्त परिमंडळ स्तरावर एकत्रीतपणे घेण्यात यावा, असेही पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.