MPC News Special : बीट मार्शलवरील पोलिसांना मिळणार पिस्तुल

एमपीसी न्यूज – बीट मार्शलवरील पोलिसांना पिस्तुल देण्यात ( MPC News Special) येणार आहे. याबाबतचा निर्णय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे आता केवळ तांत्रिक संसाधनांसह येणारे बीट मार्शल येत्या काळात पिस्तूलही घेऊन येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 पासून कार्यान्वित झाले. प्रथम पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, त्यांनतर संदीप बिष्णोई, कृष्ण प्रकाश, अंकुश शिंदे या घटक प्रमुखांनी पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले. विद्यमान पोलीस आयुक्तांनी देखील पोलिसांना सायबर साक्षर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. परिमंडळ निहाय हे सायबर साक्षरता वर्ग घेण्यात आले. नागरिकांना मदत करणाऱ्या पोलिसांचीच फसवणूक झाली अथवा पोलिसच सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकले असे व्हायला नको, यासाठी हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.

Pune : सावरकर दौड ने होणार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती सप्ताहाची सुरुवात

आता पोलीस आयुक्त चौबे यांनी बीट मार्शलच्या बळकटीकरणावर जोर दिला आहे. बीट मार्शल सर्वप्रथम घटनास्थळी जातात. घटनास्थळावरील परिस्थितीचा कोणताही अंदाज नसताना एक ते दोन पोलीस जाऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी खबरदारी म्हणून त्यांच्याकडे पिस्तुल असणे आवश्यक आहे. बीट मार्शल म्हणून नेमणुकीस असलेल्या पोलिसांना फायरिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्यांना पिस्तुल दिले जाईल.

आवश्यकतेनुसार बीट मार्शल

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात आवश्यकतेनुसार बीट मार्शल नेमण्यात आले आहे. पिंपरी सारख्या वर्दळीच्या पोलीस ठाण्यात चार तर तळेगाव एमआयडीसी सारख्या पोलीस ठाण्यात एक अशा प्रकारे बीट मार्शल नेमले गेले आहेत. शहर पोलीस दलातील 18 पोलीस ठाण्यांमध्ये 43 बीट मार्शल आहेत. त्यासोबत प्रत्येक पोलीस स्टेशनला 112 हेल्पलाईनची एक कार आहे. एका बीट मार्शलकडे एक दुचाकी, वॉकटॉकी आणि इतर तांत्रिक संसाधने असतात. त्यात आणखी पिस्तूल देखील दिले जाणार आहे.

यंत्रणा अशी काम करते

नागरिक 112 या क्रमांकावर पोलीस मदतीसाठी कॉल करतात. त्यानंतर नवी मुंबई अथवा नागपूर येथील नियंत्रण कक्षातून संबंधित पोलीस घटकांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. जाते. त्याच वेळी कॉलरच्या जवळ असलेल्या बीट मार्शलला देखील माहिती दिली जाते. बीट मार्शल तत्काळ कॉलरच्या लोकेशनवर पोहोचतात. सध्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या बीट मार्शलचा रिस्पॉन्स टाईम सरासरी दहा मिनिटे एवढा आहे. शहरी भागात सात ते आठ मिनिटे तर चाकण, महाळुंगे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव यासारख्या ग्रामीण ( MPC News Special) भागात रिस्पॉन्स टाईम 15 मिनिटांपर्यंत आहे.

बीट मार्शल ज्या भागात जातात, त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे, याची कोणतीही कल्पना नसते. पोलिसांनी प्रत्येक संकटाशी सामना करण्यासाठी कायम सज्ज असायला हवे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे-विनयकुमार चौबे ,पोलीस आयुक्त

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.