MPC News Special : उमलत्या वयात खुडल्या जाताहेत कळ्या

एमपीसी न्यूज – दररोजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांचे  (MPC News Special) आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलं गुन्हेगारी, तर मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकू लागल्या आहेत. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबत अल्पवयीन मुलींचे अपहरण, विनयभंग आणि लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यांचाही आकडा वाढत आहे. याकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

शाळा, महाविद्यालयातील मित्र, घराच्या परिसरात राहणारे तरुण, टवाळखोर यांच्याकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पालकांनी घराच्या परिसरातील वातावरण मुलींसाठी सुरक्षित आहे का, शाळा, महाविद्यालयातील वातावरणाबाबत शाळा व्यवस्थापन काळजी घेते का, या बाबींची खातरजमा करणे गरजेचे आहे. नुकत्याच वयात आलेल्या मुली, शारीरिक आकर्षण आणि कुतूहल असलेल्या मुली थोडीफार प्रलोभने आणि भूलथापांना बळी पडतात. आता आपण मोठे झालो आहेत, अशी भावना निर्माण होऊन त्या सुखी संसाराची स्वप्ने देखील रंगवू लागतात. इथेच त्यांची चूक होते. कुठलाही विचार न करता, घरच्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलणे महागात पडते.

अनेक शाळकरी मुलींना त्यांच्यासोबत लग्न करतो, असे आमिष दाखवले जाते. शाळेतून महाविद्यालयाच्या वातावरणात दाखल झालेल्या मुली अशा थापांना बळी पडतात. थोडीफार भौतिक सुखाची आश्वासने देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला जातो. न कळत्या वयात या मुली वाहवत जातात आणि वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप होतो. लग्न करतो म्हणालेला मुलगा अचानक माघार घेतो आणि अल्पवयीन असलेली मुलगी मनानेही कोसळून जाते.

Baramati : बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव

अनेक प्रकरणांमध्ये मुलींना सुरुवातीला काहीही जाणवत नाही. अचानक पोटात दुखू लागते. त्यावेळी घरचे मुलीला दवाखान्यात घेऊन जातात. तिथे काही चाचण्या केल्यानंतर मुलगी गरोदर असल्याचे निदान होते. कोवळ्या पोटात गर्भ वाढीस लागल्याने पोटात दुखण्यासारख्या समस्या सुरु होतात. अनेक प्रकरणांमध्ये मुली चार (MPC News Special) ते आठ महिन्यांच्या गरोदर झाल्यानंतर वाचा फुटली आहे. घरच्यांना समजले तर घरचे काय म्हणतील. समाज आपल्याबद्दल काय विचार करेल. ज्याच्यामुळे हे घडले आहे, तो आपल्याला आज ना उद्या स्वीकारेल अशा अनेक प्रश्नांमध्ये ती अडकते आणि वेळ निघून जाते. या गुन्ह्यांची उकल तात्काळ होत आहे. पण पालकांचे मुलांकडे होत असलेले दुर्लक्ष यासाठी मोठे कारण बनत आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हा दाखल करणे, आरोपीला अटक करणे, त्याला न्यायालयात हजर करून शिक्षा होणे ही कायदेशीर प्रक्रिया होत असली तरी कोवळ्या फुलांवर अत्याचार होऊ नये यासाठी काळजी घेणे ही मोठी जबाबदारी आहे.

मुलांकडून मोबाईलचा अतिवापर – MPC News Special

अलीकडे मोबाईल ही दैनंदिन वापरातील निकडीची वस्तू झाली आहे. गरीब असो किंवा श्रीमंत सर्वांच्या हातात मोबाईल असल्याचे पहावयास मिळतो. मोबाईलच्या या वाढत्या वापरामुळे सोशल मीडिया प्रभावी झाला आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील माणसांना त्याचे व्यसन लागले आहे. नकळत्या वयातच हातात मोबाईल आल्यामुळे अल्पवयीन मुले देखील बेभान झाल्याचे जाणकारांचे मत आहे.

चित्रपटांचा बालमनावर परिणाम

मागील काही वर्षांपासून कमी वयातील मुलांच्या प्रेमकथा चित्रपटांमध्ये दाखवल्या जात आहे. विशेष म्हणजे अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसादही चांगला मिळू लागला आहे. त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याच्या वयात मुले शाळा सोडून प्रेमाच्या गप्पा करू लागली आहेत. यातूनच अल्पवयीन मुलांमध्ये भांडणे तर मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकू लागल्या आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांच्या टीव्ही समोर बसण्याच्या वेळा देखील ठरवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

वेळ निघून गेल्यानंतर पालकांचा कांगावा

आपली अल्पवयीन मुलगी कोणासोबत तसेच कोठे आहे, याबाबत पालक जागरूक राहत नाहीत. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर पालक खडबडून जागे होतात. पोलीस ठाण्यात जाऊन रडारडा व कांगावा करतात. समज नसलेल्या अल्पवयीन मुली देखील संबंधित प्रियकर तरुणाला वाचवण्यासाठी चुकीची माहिती पोलिसांना देत असल्याचे काही प्रकरणांमध्ये समोर आले आहे.

मुलांच्या मोबाईलमध्ये डोकवण्याची गरज

आपला पाल्य मोबाईलवर कोणाशी संपर्कात आहे. तसेच, तो सोशल मीडियावर (MPC News Special) कोणाशी चॅट करीत आहे. व्हाट्सअपवरील कोणत्या ग्रुपमध्ये आपला पाल्य जास्त वेळ घालवतोय, याची इतंभूत माहिती पालकांनी ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून ऐन उमेदीच्या काळात आपल्या पाल्याकडून कोणतेही वाकडे पाऊल पडणार नाही.

मुलगी खरंच शाळेत आहेत का ?

शहरातील उद्यानांमध्ये शालेय गणवेशातील मुली प्रियकरा सोबत बसलेल्या आढळून येतात. त्यामुळे पालकांनी आपली मुलं खरंच शाळेत आहेत का, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाल्याच्या शिक्षकांशी मनमोकळा संवाद ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे मुलांचे शाळेतील वर्तन कसे आहे, याबाबत माहिती मिळू शकते. तसेच, आपल्या पाल्याने शाळेला दांडी मारल्यास माहिती मिळू शकते.

‘त्या’ बाळांचे भविष्य संस्थेच्या हातात

अल्पवयीन मुलीची गर्भधारणा झाल्यानंतर संबंधित प्रियकर तरुणावर ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यानंतर मुलीची शारीरिक क्षमता व वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर प्रसूती करण्याबाबत डॉक्टर निर्णय घेतात. प्रसूती केल्यानंतर पोलीस संबंधित बाळाला शासनमान्य संस्थेकडे सोपवतात. संस्था मुलांना योग्य पालक पाहून दत्तक देतात. कमी कालावधीचा गर्भ असल्यास गर्भपात करण्याचा निर्णय घेतला जातो.

आरोपींचा आटापिटा

‘पॉस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी जेलमधून सुटण्यासाठी संबंधित बाळाची जबाबदारी घेण्यासाठी तयार होतात. मात्र, न्यायालयाकडून अशा आरोपींना कोणतीही सहानुभूती मिळत नसल्याचे तपासी अधिकारी सांगतात.

महिनाअपहरणविनयभंग लैंगिक अत्याचार
जानेवारी5468
फेब्रुवारी3989
मार्च49613
एप्रिल39610

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.