MPC News Special : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाचा उतारा आवश्यक

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ( MPC News Special ) वाहतूक कोंडी आणि अपघात ही नित्याची बाब झाली आहे. एखाद्या दिवशी वाहतूक कोंडी न झाली तरच नवल. वारंवार होणाऱ्याअपघातांमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) महामार्गावर करण्यात आलेल्या उपाययोजना फोल ठरल्याच्या भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे जुन्या महामार्गावर महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे आवश्यक आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. या वाहतूक कोंडीने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. पावसाळ्यात मावळ परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. त्यात सुट्टीच्या दिवशी तर प्रशासनाची चांगलीच दमछाक होते.

Pune : बैलगाडा शर्यतीदरम्यान घोड्याने उडवलं पण बैलाने वाचवलं; पुण्यातील थरारक घटना

तासंतास रस्त्यावरील कोंडीत वाहने अडकून पडल्याच्या घटना घडतात. सोमाटणे फाटा येथून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाकडे जाणाऱ्या चौकात वाहतूक कोंडी सातत्याने होते. देहूरोडच्या सेन्ट्रल चौकात तर वाहतूक विभागाचे कार्यालय असूनही इथे वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या रांगा लागण्याचा प्रकार होतोच.

अनेकांनी जीव गमावला
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मागील वर्षभरात सुमारे 225 अपघात झाले. त्यात सुमारे 125 जणांनी जीव गमावला असून 170 पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनांच्या नुकसानीचा आकडा कोट्यावधी रुपयांच्या घरात गेला आहे. चालू वर्षात देखील अपघातांची मालिका सुरूच आहे. दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. तसेच अनेक ठिकाणच्या उपायोजना फोल ठरत आहेत.

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
तळेगाव येथील स्थानिक रहिवासी निलेश गराडे म्हणाले, जुन्या पुणे मुंबई महामार्गावर अपघात होणे, वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. रस्त्यांची दुरावस्था, वाहन चालकांचा निष्काळजीपणा, प्रशासनाने दुर्लक्ष अशी यामागे कारणे आहेत. नागरिक आणि प्रशासन अशा दोन्ही बाजूनी प्रयत्न झाल्यास वाहतूक कोंडी आणि अपघातांवर मार्ग काढता येणे शक्य आहे.

येथे उड्डाणपुलांची गरज
जुन्या महामार्गावर सेंट्रल चौक देहूरोड, सोमाटणे फाटा, लिंब फाटा तळेगाव दाभाडे, चाकण फाटा तळेगाव दाभाडे, वडगाव कमान चौक वडगाव, मातोश्री हॉस्पिटल चौक वडगाव, शिवराज हॉटेल चौक वडगाव, बस स्टॉप चौक वडगाव, कान्हे फाटा या चौकांमध्ये उड्डाणपूल बांधण्याची नितांत आवश्यकता ( MPC News Special ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.