MPC Online Ganeshotsav : ‘एमपीसी’च्या ऑनलाईन गणेशोत्सवात ‘चांदीचं नाणं’ जिंकण्याची संधी, दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या वतीने सहा विजेत्यांना ‘चांदीचं नाणं’

एमपीसी न्यूज – ‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेशभक्तांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे या गणेशोत्सवात ‘चांदीचं नाणं’ जिंकण्याची संधी त्यांना मिळणार आहे. यासाठी प्रसिद्ध ‘दिलीप सोनिगरा ज्वेलर्स’ने स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले असून, अंतिम निवड झालेल्या सहा विजेत्यांना त्यांच्या वतीने ‘चांदीचं नाणं’ बक्षिस म्हणून दिले जाणार आहे.

गणेशोत्सवा निमित्त पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले न्यूज पोर्टल ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाईन गणेशोत्सव संकल्पना राबवत आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आपल्या घरातील, सोसायटीतील अथवा कार्यालयातील बाप्पाचा फोटो ‘एमपीसी न्यूज’ला पाठविण्याचे आवाहन केले आहे. ‘एमपीसी’च्या ऑनलाईन गणेशोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळत असून, यापैकी सर्वोत्कृष्ट फोटो पाठविणा-या सहा जणांना आता चांदीचे नाणे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

प्रसिद्ध सूवर्णपेढी ‘दिलीप सोनगिरा ज्वेलर्स’ यांनी ‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. चिंचवडगाव, हिंजवडी, चाकण, कामशेत, रहाटणी आणि तळेगाव दाभाडे या प्रत्येक विभागातून प्रत्येकी एक विजेता निवडला जाणार असून, निवड झालेल्या अंतिम विजेत्याला ‘दिलीप सोनगिरा ज्वेलर्स’च्या संबधित शाखेत  ‘चांदीचं नाणं’ भेट दिले जाणार आहे. दिलीप सोनगिरा ज्वेलर्स शंभर टक्के हॉलमार्कचे दागिने देणारी विश्वासहार्य सुवर्णपेढी आहे. 1969 सालापासून पन्नास वर्षांहून अधिक काळ सुवर्णपेढी ग्राहकांच्या सेवेत आहे.

 

विजेता निवडीसाठी नियम

– एकूण सहा विजेते निवडले जाणार (प्रत्येक विभागातून एक)

– प्रत्येक विभागातील विजेत्याला ‘दिलीप सोनगिरा ज्वेलर्स’च्या संबधित शाखेत ‘चांदीचं नाणं’ भेट दिले जाईल.

– विजेता निवडीचे अधिकार ‘एमपीसी न्यूज’च्या परिक्षकांकडे राहतील

 

फोटो पाठवण्यासाठी

‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील मेलवर आपले फोटो,नाव,पत्ता आणि मोबाईल क्रमांक पाठवावे.

[email protected] / [email protected]

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.