MPC News Exclusive: धक्कादायक! एक कोविड सेंटर असेही….?

एमपीसी न्यूज (गणेश यादव, प्रमोद यादव) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनाच्या लक्षणेविरहित रुग्णांसाठी घरकुलमध्ये लाखो रुपये खर्च करुन ‘सीसीसी’ सेंटर सुरु केले. दरम्यानच्या काळात लसीकरण, जनजागृती आणि उत्तम आरोग्यसेवा या साऱ्याच माध्यमातून प्रयत्न करत दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यात महापालिकेला यश देखील मिळाले. परंतु सुसज्यपणे उभारलेल्या या कोविड सेंटरची आरोग्य सुविधा चक्क धुळ खात पडली आहे. केवळ थोडे थोडके नव्हे तर करोडो रुपये खर्च करून उभारलेले कोविड सेंटर आता दारुड्यांचा अड्डा बनला आहे, शिवाय तेथे सुरक्षारक्षक नसल्याने चोऱ्या होत आहेत. हा धक्कादायक प्रकार ‘एमपीसी न्यूज’ने नुकताच उघडकीस आणला खरा, पण  महापालिका त्यावर काय पाऊले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आरोग्य व्यवस्थेची ही विदीर्ण अवस्था –  

नेमकं काय चित्र दिसलं?

सीसीसी कोविड केअर सेंटर, घरकुल – कोविड रुग्णांसाठी महापालिकेकडून उचलेलं पाऊल

कोविड सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतर हॅण्डग्लॉज, हातमोजे, गाद्या, सलाईन, पाण्याच्या बाटल्या तिथेच जाळलेल्या स्वरूपात दिसून येत आहेत.

दारूच्या बाटल्या देखील तिथेच पडलेल्या… दारुड्यांनी कोविड सेंटरला बनवला अड्डा!

रुग्णांसाठी पांघरूण म्हणून मागवलेल्या सोलापूर चादरी पडल्या धूळखात… 

टेबलांची दुर्दशाही तशीच… अगदी नव्या टेबलांना धुळीचे कव्हर!

याला कचरा म्हणावं की आरोग्य सुविधा?

बेड, ऑक्सिजन सिलेंडर सारे काही उघड्यावरच!

या अस्थाव्यस्त आरोग्य साहित्याचे भविष्य काय?

‘कोणी आमच्याकडे सुद्धा लक्ष द्या’ म्हणून या विखूरलेल्या गिझरचा टाहो असेल का?

अजून एक दुर्लक्ष कोपरा…!

असे हे दुर्लक्षित चित्र संपुर्ण सीसीसी केविड केअर सेंटरमध्ये पाहायला मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.