Wakad : रहाटणीमधील सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

एमपीसी न्यूज – रहाटणी येथील 25 वर्षीय सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. कारवाई केलेल्या आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात केली असून याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शुक्रवारी (दि. 4) दिले.

सुमित उर्फ राधे दयानंद सोमवंशी (वय 25, रा. नखातेवस्ती, रहाटणी), असे कारवाई केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी रॉड, कोयता यांसारखी घातक हत्यारे बाळगून दंगा, खुनाचा प्रयत्न, हल्ल्याची पूर्व तयारी करून अनधिकृतपणे घरात घुसणे. तोडफोड करून मालमत्तेचे नुकसान करणे, गंभीर दुखापत, दंगा, डांबून ठेऊन खंडणी मागणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे यांसारखे आरोपी सुमित याने गुन्हे केले आहेत. आरोपी सुमित याच्यावर सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.

त्याचा गुन्ह्यांचा वाढता आलेख पाहता त्याच्यावर कारवाई करणे आवश्यक होते. तसेच आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वाकड पोलिसांनी आरोपी सुमित याच्यावर एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला. त्याला पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शुक्रवारी (दि. 4) मंजुरी देत आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.