MPSC Breaking News : शिंदे-फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा; नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू

एमपीसी न्यूज : एमपीएससी परीक्षांची (MPSC Breaking News) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने अखेर विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करून नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील एमपीएससी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Chinchwad Crime News : तीन पिस्टल व तीन काडतुसासह तिघांना अटक

आज अल्का टॉकीजजवळ एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन केले होते. आजच्या आंदोलनाचे स्वरूप हे साष्टांग दंडवत होते. या आंदोलनात भाजपचे अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर तर आमदार सदाभाऊ खोत देखील सहभागी झाले होते. त्यांनी सरकारसोबत बातचीत करण्याचे आश्वासनही दिले (MPSC Breaking News) होते.

कोरोना महामारीनंतर दोन वर्षानी एमपीएससीची परिक्षा होत आहे. परंतु, त्यासाठी बदललेला अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या परीक्षेत मोठा अडथळा ठरला आहे. हा अभ्यासक्रम 2025 रोजी बदलावा अशी मागणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर आज त्यांचे तिसरे आंदोलन होते. हे आंदोलन यशस्वी झाले असून याबाबत थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.