MPSC EXAM : राज्य सेवा पूर्व परिक्षा 14 मार्चला, आयोगाच्या नव्या तारखा जाहीर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -2020, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 (रविवार, 14 मार्च 2021), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -2020 (शनिवार, 27 मार्च 2021) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 (रविवार, 11 एप्रिल 2021) रोजी होणार आहे.

यापूर्वी राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 11 ऑक्टोबर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -2020 1 नोव्हेंबर, व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 22 नोव्हेंबर 2020 होणार होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.