MPSC Exam : एमपीएससी परीक्षा वेळापत्रकानुसार होणार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा नियोजित वेळेनुसार रविवारी (दि.11) होणार आहे. एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

एमपीएससी परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल होणार नसून, योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन होऊन परीक्षा पार पाडली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या रविवारी 11 एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट पसरले होते.

मात्र, परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल होणार नसून, नियोजित वेळापत्रकानुसार परिक्षा होणार असल्याचे आयोगाने म्हंटले आहे.

दरम्यान, राज्यात शनिवार-रविवार लॉकडाऊन असल्याने परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या परीक्षेदरम्यान वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी, असं आवाहन सरकारला केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.