MPSC Exam Postponed : 11 एप्रिलला होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलली

राज्य सरकारच निर्णय

एमपीसी न्यूज – वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (दि.11) होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली आहे. मुख्यमंत्री उद्धव  ठाकरेंनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.11) होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा पुढे ढकलली जावी अशी मागणी परिक्षार्थी करत होते. याबाबत अनेक नेत्यांनी देखील मागणी परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी करत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना फोन करून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली होती. बैठकीत परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेची पुढील तारीख आयोगामार्फत जाहीर केली जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.