Pune Crime News : पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, 2 जानेवारीला होती पूर्व परीक्षा

एमपीसी न्यूज – पुण्यातील दौंड तालुक्यातील एमपीएससी ची तयारी करणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मल्हारी नामदेव बारवकर (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मल्हारी हा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. यापुर्वी त्याने तीन ते चार वेळा ही परीक्षा दिली होती. येत्या 2 जानेवारीला त्याची पूर्व परीक्षा होणार होती. परंतु सतत परीक्षा पुढे ढकलत असल्यामुळे तो निराश झाला होता.

मल्हारीच्या वडिलांनी जमीन विकून मल्हारीच्या शिक्षणासाठी पैसे उभे केले होते. मात्र आज सायंकाळच्या सुमारास यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात मल्हारी बारवकर यांचे चुलते महादेव पांडुरंग बारवकर यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.