Pimple Saudagar : श्री छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुल एकेरी वाहतुकीसाठी खुला – नाना काटे

एमपीसी न्यूज –  औंध – रावेत बीआरटीएस या मार्गावारील जगताप डेअरी साई चौक येथील श्री छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलचा काळेवाडी कडुन औंधकडे जाणारा पुलाचा एकेरी मार्ग सोमवारी (दि. 31 डिसेंबर) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला .

_MPC_DIR_MPU_II

श्री छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूलाचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप आणि नवनगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे,नगरसेविका शितल नाना काटे , प्राधिकरणचे सीईओ सतिशकुमार खडके , प्राधिकरणचे अधिक्षक अनिल सुर्यवंशी ,महानगरपालिकेचे शहर अभियंता ओंभासे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . यासंदर्भात विठ्ठल उर्फ नाना काटे आणि नगरसेविका शितल नाना काटे यांनी प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याशी चर्चा करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा एकेरी मार्ग सुरू करण्याची मागणी केली होती. पुलाचे बांधकाम चालू असताना काळेवाडी कडून औंध मार्गे पुण्याकडे जाणा-या वाहनाना शिवार चौकातून वळून परत साई चौक जगताप डेअरीकडे वळावे लागत होते .त्यामुळे शिवार चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या वर्दळीमुळे रोजच वाहतूक कोंडी होत होती.

पिंपळे सौदागर मधील बहुतांश नागरिक नोकरीनिमित्त हिंजवडीकडे जाणारे आयटीयन्स या रोजच्या वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत होते . यामुळे नागरिकांना वेळेचा अपव्यय आणि मानसिक त्रास होत होता. काळेवाडीहून पुण्याकडे जाणारी वाहने पुलावरून सरळ गेल्यामुळे शिवार चौक तसेच साई चौक येथील वाहतुकीवर येणारा ताण कमी होऊन मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या सोडविण्यास मदत होणार आहे.असे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे आणि नगरसेविका शितल नाना काटे यांनी सांगितले. हा उड्डाणपूल एकेरी वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.