MSD Birthday: एमएस धोनी..नंबर सेव्हन…धोनीला बर्थडेला ड्वेन ब्रावोचं खास गिफ्ट, पाहा व्हिडिओ…

MS Dhoni birthday: Dwayne Bravo Gifts Birthday Boy MS Dhoni The "Helicopter Song" watch video हेलिकॉप्‍टर 7 ने उड्डाण केलं आहे. ब्रावोचा थाला एमएस धोनीला ट्रिब्‍यूट। हॅप्‍पी बर्थडे एमएस धोनी.

एमपीसी न्यूज- भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचा आज 39वा वाढदिवस आहे. वयाच्या 23व्या वर्षी त्याने भारतीय संघात आपलं स्थान मिळवलं आणि त्यानंतर ‘कॅप्टन कुल’ म्हणून त्याने जगभरात नाव कमावलं आहे.

_MPC_DIR_MPU_II

ड्वेन ब्रावोने धोनीला बर्थ डे दिवशी ट्रिब्यूट म्हणून खास गाणं तयार केलं आहे. या गाण्यात त्याने हेलिकॉप्‍टर शॉट आणि त्याच्या 7 आकड्याबद्दल उल्लेख केला आहे.

चेन्नई सुपर किंग्सने ऑफिशियल टि्वटर हँडलवर ब्रावोचं हे गाणं शेअर करत म्हटलं की, ”हेलिकॉप्‍टर 7 ने उड्डाण केलं आहे. ब्रावोचा थाला एमएस धोनीला ट्रिब्‍यूट। हॅप्‍पी बर्थडे एमएस धोनी.”

बीसीसीआयने एम एस धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्या काही ठराविक षटकारांचा समावेश असलेला एक व्हिडिओ तयार केला आहे.

आयसीसीने धोनीच्या विजय कारकीर्दीचा आढावा घेत जगातील एक सर्वोत्तम कर्णधार असा उल्लेख करत एम एस धोनीला शुभेच्छा दिले आहेत.

केदार जाधवने धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपल्या आणि चाहत्यांच्या भावना व्यक्त करणारं पत्र लिहिले आहे. पत्र्याच्या शेवटी केदार जाधव म्हणतो ‘अभी ना जाओ छोड के, के दिल अभी भरा नही …’

भारतीय खेळाडूंनी सुद्धा एम एस धोनीला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like