MS Dhoni News : धोनी करणार ‘कडकनाथ’ कोंबडी विक्रीचा व्यवसाय

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आता कडकनाथ कोंबड्यांचा विक्री व्यवसाय करणार आहे. मध्य प्रदेशातील झाबुआ येथील कडकनाथच्या दोन हजार पिल्लांसाठी अग्रिम मोबदल्यासोबत झाबुआच्या आदिवासी शेतकऱ्याला त्याने ऑर्डर दिली आहे.

झाबुआ जिल्ह्यातील थांदला खेड्यातील शेतकरी विनोद मेधा धोनीच्या टीमला 2000 कडकनाथ पिल्लांची पुरवठा करणार आहेत. विनोद मेधा 15 डिसेंबरपर्यंत ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिली आहे.

विनोद यांना आशा आहे की, जेव्हा ते रांची येथे कडकनाथ पिल्लांची डिलिव्हरी देण्यासाठी जातील तेव्हा ते धोनीसारख्या व्यक्तीला भेटतील.

धोनी आपल्या 43 एकरच्या जागेत जैविक शेती करण्याचा विचार करत असल्याचं वृत्त जुलै 2020 मध्ये समोर आलं होतं. यावेळी धोनीचा एक फोटोही समोर आला होता.

धोनीच्या टीमने दुग्धव्यवसायासाठी साहीवाल जातीच्या गायी पाळल्या आहेत. सोबतच तो मत्स्यव्यवसाय देखील करत आहे. आता याच जागेत बदक आणि पोल्ट्री व्यवसायही केली जात आहे.

जुलै 2020 मध्ये धोनीचे 43 एकर शेतीत शेती करतानाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे धोनीची टीम आता डेअरी क्षेत्रातही उतरली आहे. सहीवाल जातीच्या गाई धोनी टीमने विकत घेतल्या आहेत. तसेच मत्सोद्योगासह बदक पालन आणि पोल्ट्री फार्ममध्ये देखील धोनीने गुंतवणूक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.