Kothrud : एमएसईबीच्या कामगाराला वीज कनेक्शन तोडल्यामुळे धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – एमएसईबीच्या कामगाराला वीज कनेक्शन तोडल्यामुळे धक्काबुक्की केल्याची घटना काल मंगळवारी(दि.9) दुपारी1 वाजता कोथरूड येथील मयुरेश डायनिंग हॉलच्या चौकात घडली.

याप्रकरणी संतोष राऊत(वय 28, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली असून महेश श्रीधर काटे(वय 29, रा. वारजे -माळवाडी) व विकास श्रीधर काटे(वय 35, रा.वारजे माळवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष राऊत हे एमएसईबीमध्ये (महाराष्ट्र राज्य वितरण विभाग) कार्यरत असून ते कोथरूड येथील एका घरी वीजेचे बील न भरल्यामुळे तेथील कनेक्शन तोडण्यासाठी गेले असता तेथील महेश आणि विकास या दोघांनी फिर्यादीशी वाद घालून त्यांना शिव्या देऊन धक्काबुक्की करून त्यांच्या कामात अडथळा आणला त्यामुळे त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.