MSEB Recruitment : महावितरणमधील उपकेंद्र व विद्युत सहाय्यकांच्या सात हजार जागांची भरती

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. : Recruitment of 7,000 posts of sub-stations and electrical assistants in MSEDCL

एमपीसीन्यूज – महावितरणमधील उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यकाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी 4 ऑगस्ट रोजी आयोजित बैठकीत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

यापूर्वी, 23 जूनला ऊर्जामंत्री यांनी या संदर्भात भरती करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोविड आणि लॉकडाऊनमुळे त्यास विलंब झाला होता. उपकेंद्र सहाय्यक पदाच्या दोन हजार जागा आणि विद्युत सहाय्यकाच्या पाच हजार जागा भरल्या जाणार आहेत.

आता ही भरती दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात उप केंद्र सहाय्यकांचे दस्तावेज तपासणी करून भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर विद्युत सहाय्यक निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

7 हजार जागांची मेगा भरती असल्याने सोशल डीस्टंसिंग आणि कोविड नियमांचे पालन करून ही पदभरती करण्यात यावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.