Pune Crime News : महावितरणचा अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात, ‘या’ कारणासाठी घेतली लाच

एमपीसी न्यूज – महावितरणच्या एका कार्यकारी अभियंत्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरणच्या मंचर कार्यालयात ही कारवाई केली. हेमचंद्र हरी नारखेडे (वय 57) असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. मंचर पोलिस ठाण्यात या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 38 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी तक्रार दिली होती.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे ठेकेदार आहेत. त्यांनी मंचर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात इलेक्ट्रिक पोल बदलून मिळवण्यासाठी अर्ज केला होता. महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता असलेल्या हेमचंद्र नारखेडे यांनी हा पोल बदलून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडी अंती तीन हजार रुपयात हा व्यवहार ठरला होता.

दरम्यान लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची तक्रार दिली होती. त्यानंतर गुरुवारी मंचर येथील कार्यालयात सापळा रचून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना नारखेडे याला ताब्यात घेतले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.