Dehuroad News : वीज कनेक्शन तोडल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण

एमपीसी न्यूज – वीजबिल थकीत असल्याने महावितरण कडून वीज कनेक्शन तोडण्यात आले. यावरून तिघांनी मिळून महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 11) दुपारी देहूगाव येथे घडली.

वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप विठ्ठल रोडे (वय 26, रा. आळंदी), सहाय्यक तंत्रज्ञ मारुती किसनराव गडदे अशी मारहाण झालेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी रोडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दीपक पांडुरंग चव्हाण (वय 36), निखिल पांडुरंग चव्हाण (वय 28), विक्रम पांडुरंग चव्हाण (वय 30, सर्व रा. देहूगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम चव्हाण आणि प्रताप चव्हाण यांचा देहूगाव येथे व्यावसाय आहे. त्यासाठी त्यांनी वीज कनेक्शन घेतले आहे. चव्हाण यांचे व्यावसायिक वीजबिल मागील काही महिन्यांपासून थकीत होते.

थकीत वीजबिल असणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरण कडून सुरू आहे. चव्हाण यांचे देखील वीजबिल थकले असल्याने फिर्यादी रोडे आणि त्यांचे सहकारी यांनी चव्हाण यांचे वीज कनेक्शन तोडले. या रागातून तिघा आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत तीन जणांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 353, 332, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

थकीत वीजबिल ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणने सुरू केल्यानंतर राज्याच्या विधीमंडळात याचे पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम तात्पुरती थांबवण्याचे आदेश दिले. मात्र अधिवेशन संपताच महावितरणने आपली मोहीम पुन्हा सुरू केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.