Pune : 10 हजारांपेक्षा अधिक वीजबिल भरण्यासाठी घरगुती ग्राहक व हौसींग सोसायट्यांना ‘आरटीजीएस’ची सुविधा उपलब्ध

एमपीसी न्यूज –  घरगुती ग्राहक व को-आॅपरेटीव्ह हौसींग सोसायट्यांना 10 हजारांपेक्षा अधिक वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून ऑनलाईनसोबतच आता ‘आरटीजीएस’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील को-आॅपरेटीव्ह हौसींग सोसायट्यांकडून वीजबिलांची रक्कम भरण्यासाठी ऑनलाईनची सोय असली तरी प्रामुख्याने धनादेशद्वारे भरण्यात येते. मात्र  लॉकडाऊनच्या काळात बँकींग व्यवहारांवर परिणाम झाला आहे. ही अडचण लक्षात घेऊन को-आॅपरेटीव्ह हौसींग सोसायट्यांसाठी महावितरणने 10 हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल भरण्यासाठी ‘आरटीजीएस’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच सिंगल किंवा थ्रीफेज घरगुती वीजग्राहकांनाही आता 10 हजारांपेक्षा अधिक वीजबिलांची रक्कम ‘आरटीजीएस’द्वारे भरता येईल.

ऑनलाईनद्वारे क्रेडीट कार्ड, नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, गुगलपे, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेट आदींद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहे. घरगुती ग्राहक व को-आॅपरेटीव्ह हौसींग सोसायट्यांना 10 हजारांपेक्षा अधिक रकमेचा ‘आरटीजीएस’द्वारे भरणा करण्यासाठी त्यांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याची माहिती देण्यात येत आहे. यापुढे ज्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याची माहिती असेल त्याच ग्राहकांना ‘आरटीजीएस’द्वारे रक्कम भरता येणार आहे.

‘एसएमएस’द्वारे थेट पेमेंट लिंक – घरबसल्या वीजबिलांचा ऑनलाईनद्वारे भरणा करण्यासाठी महावितरणकडून लघुदाब वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे थेट पेमेंट लिंक पाठविण्यात येत आहे. नोंदणीकृत मोबाईलधारक वीजग्राहकांना वीजबिलाची रक्कम, देय दिनांक आदींसह पेमेंट लिंकसुद्धा पाठविण्यात येत आहे. या लिंकद्वारे संबंधीत ग्राहकांना स्वतःचे वीजबिल ऑनलाईनद्वारे थेट भरण्याची सोय आहे. ज्या वीजग्राहकांनी अद्यापही ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही त्यांनी नोंदणी करावयाच्या

मोबाईल क्रमांकावरून 9930399303 क्रमांकावर MREG(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ करावा. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.