MSEDCL News : महावितरण वर्षभरात उभारणार राज्यात तब्बल 500 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन  

एमपीसी न्यूज : विजेवरील वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महावितरण वर्षभरात राज्यात तब्बल 500 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. ही चार्जिंग स्टेशन मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेबरोबरच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांत असणार आहेत.

इलेक्ट्रिक वाहनधारकांना येथे सुमारे साडेसहा रुपये प्रतियुनिट दराने वीज मिळणार आहे. तसेच चोवीस तास ही चार्जिंग स्टेशन सुरू असणार आहेत.राज्यात विजेवर चालणाऱया वाहनांच्या वापराला सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने प्रायोगिक तत्त्वावर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत दहा चार्जिंग स्टेशन उभारली आहेत. त्यानंतर आता पुढील वर्षभरात आपल्या वीज वितरणाच्या नेटवर्कचा वापर करून राज्यात ठिकठिकाणी पाचशे चार्जिंग स्टेशन उभरण्याची योजना तयार केली आहे.

ही चार्जिंग स्टेशन अत्याधुनिक असणार असून जीपीआरएसद्वारे जोडली जाणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांना चार्जिंग स्टेशनचे ठिकाण सहजपणे समजणार आहे.महावितरण आपल्या वीज उपकेंद्राच्या परिसरातच चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे टेन्शन असणार नाहीग्राहकाला चार्जिंग स्टेशनवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करून ओटीपी जनरेट करावा लागेल.

त्यांनतर ऑनलाइन पैसे भरल्यानंतर गाडी चार्जिंग होऊ शकणार आहेचार्जिंग स्टेशनच्या उभारणीचा जास्तीत जास्त अडीच लाख रुपये खर्च.मानवरहित डीसी चार्जिंग स्टेशन असणार आहे.सुमारे एका तासात गाडी पूर्ण चार्ज होणार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.